मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम हे नव्वदच्या दशकातील खतरनाक गोलंदाज. ऍलन डोनाल्डच्या वेग आणि स्विंग पुढे आणि अक्रमचा जबरदस्त रिव्हर्स स्विंगचा सामना करताना अनेक फलंदाज गर्भगळीत व्हायचे. दोघेही आपापल्या संघातील उच्च कोटीचे खेळाडू होते.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम याने ऍलन डोनाल्ड विषयीची एक रोमांचकारी घटना शेअर केली. वसीम अक्रम इंग्लंडमध्ये लंकेशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळत होता. तो फलंदाजीस उतरला तेव्हा ऍलन डोनाल्ड शॉटपिच चेंडू टाकला. तो चेंडू अक्रमच्या हनुवटीवर लागला. त्यामुळे त्याला वीस टाके पडले.
अक्रम आपला सहकारी खेळाडू बासित अली यांच्यासोबत यूटय़ूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, ” 1989 साली झालेल्या सामन्यात मी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरलो. ऍलन डोनाल्डने 150 किलोमीटरच्या वेगाने शॉर्टपिच चेंडू फेकला. त्यावेळी मी खूपच युवा आणि नवखा खेळाडू होतो. तो चेंडू पूलशॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू स्पर्श करून तो थेट माझ्या हनुवटीवर लागला. माझ्या हनुवटीवर वीस टाके पडले होते.”
तो म्हणाला, “त्यानंतर मला काही दिवसांची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले पण मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन मी मैदानार उतरलो. आणि गोलंदाजी केली आणि हा सामना अलगतपणे जिंकला. परंतु पुढे डोनाल्डने इतका का घाबरला की पुन्हा माझ्यासमोर फलंदाजी करण्यास आला नाही.”