इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचे २ वेळा किताब पटकावणारा संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स होय. मात्र, यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात कोलकाताला प्लेऑफची फेरी गाठता आली नाही. त्यांना बुधवारी (दि. १८ मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या ६६व्या सामन्यात २ धावांनी पराभूत व्हावे लागले. केएल राहुल याच्या नेतृत्वातील लखनऊ संघाने या विजयासह प्लेऑफ फेरी गाठली. अशी कामगिरी करणारा लखनऊ संघ हंगामातील दुसरा संघ ठरला. ही कामगिरी करण्यामध्ये मोलाचे योगदान यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी दिले. डॉ कॉक याने कारकीर्दीत ७० चेंडूत १४० धावा चोपल्या. त्याची खेळी पाहून राहुलही म्हणाला की, तो दुसऱ्या बाजूने एका प्रेक्षकाप्रमाणे पाहत राहिलो.
क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने तीन वेळा जीवदान मिळाल्यानंतर तुफान फटकेबाजी केली. त्याने आपले शतक झळकावताना १० चौकार आणि १० षटकार चोपले. दुसरीकडे, केएल राहुल (KL Rahul) याने ५१ चेंडूत ६८ धावा चोपल्या. यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना कोणतीही विकेट न गमावता २१० धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला ८ विकेट्स गमावत २०८ धावाच करता आल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने यावेळी ५० धावा, नितीश राणाने ४२ धावा आणि सॅम बिलिंग्सने ३६ धावा चोपल्या.
विजयानंतर केएल राहुल म्हणाला की, “आमची फलंदाजी चांगली होती. क्विंटनच्या खेळीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आज काही षटकात मी फक्त प्रेक्षक होतो. मला वाटते की, मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ती एक होती. मोहसिनने चांगली गोलंदाजी केली. गेल्या काही सामन्यांत तो चांगली कामगिरी करत आहे. या सामन्यातून तुम्हाला हे शिकायला मिळते की, शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल तुमच्याकडे वळू शकतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राहुल पुढे बोलताना म्हणाला की, “या मोसमात आम्ही असे अनेक सामने गमावले आहेत. असे सामने हरल्यानंतर तुम्हाला कसे वाटते हे मला माहिती आहे. तो एक उत्तम सामना होता. याचे श्रेय दोन्ही संघातील खेळाडूंना जाते. शेवटच्या दोन चेंडूंवर स्टॉयनिसने ज्या पद्धतीने योजनेनुसार गोलंदाजी केली आणि विजय मिळवला, तो शानदार होता.”
रिंकू सिंगने केली ताबडतोब ४० धावांची खेळी
रिंकू सिंगने आपल्या ताबडतोब ४० धावा आणि सुनील नारायणने ७ चेंडूत २१ धावा केल्या. तसेच, आपल्या संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले होते. ज्यावेळी कोलकाताला २ चेंडूत ३ धावांची आवश्यकता होती, तेव्हा स्टॉयनिसने एविन लुईसच्या शानदार झेलाच्या मदतीने रिंकूला बाद केले. त्यानंतर त्याने उमेश यादवच्या दांड्या उडवल्या. मोहसिननेही २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. कोलकाताचा हा १४ सामन्यांतील ८वा पराभव होता. त्यामुळे ते हंगामातून बाहेर पडले.
भले शाब्बास! आता गेल अन् डिविलियर्ससोबत घेतलं जाणार क्विंटन डी कॉकचं नाव, पाहा त्याचा पराक्रम