---Advertisement---

‘मला नेहमीच फेल कर्णधार मानले गेले’, धोनीसोबतच्या नात्यावरही बोलला विराट कोहली

On: शनिवार, फेब्रुवारी 25, 2023 12:31 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारतीय दिग्गज विराट कोहली याने मागच्या वर्षी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये विराट कर्णधापदावरून पायउतार होण्यापूर्वी भारताने त्याच्या नेतृत्वात अनेक महत्वाच्या माहिला जिंकल्या. पण विराट एकाही आयसीसी स्पर्धेत संघाला विजेतपद मिळवून देऊ सकला नाही. आरसीबी पॉडकास्टवर बोलताना विराटने हीच गोष्ट बोलून दाखवली आणि चाहते त्याला अपयशी कर्णधार समजतात, असे म्हटले.

भारतीय संघाने विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच आयसीसी विश्वचषकचा उपांत्य सामना सामना खेळला. पण दोन्ही वेळी संघाला पराभव स्वीकारावा लागला. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाचे प्रदर्शन नेहमीच चर्चेचा विषय ठरला. त्याने संघाला अनेक मालिका जिंकवून दिल्या असल्या, तरी विश्वचषक न जिंकल्याची खंत विराटच्या मनात देखील आहे. आरसीबी पॉडकास्टवर (RCB podcast) बोलताना विराटने या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली. विराटने यावेळी माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सोबत त्याचे संबंधांवर देखील चर्चा केली.

आरसीबी पॉडकास्टवर विराट कोहली बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना, आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि आयसीसी पुरुष विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला. पण तरीही त्याची गणना अपयशी कर्णधारांमध्येच केली जाते.” विराट कारकिर्दीतील अनेक वर्ष एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळला आणि नंतर धोनीने त्याला कर्णधारपदाचे धडे दिले. धोनीसोबतच्या आपल्या नात्यावरही विराटने मोकळेपणाने चर्चा केली.

“जेव्ही मी खराब काळातून जात होतो, तेव्हा कुटुंबियांव्यतिरिक्त त्याला धोनीची साथ मिळाली. धोनीसाठी माझ्या मनात खूप सन्मान आहे. मी त्याच्याशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू शकतो. मी त्याला कधीही फोन केला, तर 99 टक्के वेळा तो फोन उचलत नाही. कारण तो फोन पाहतच नाही. पण दोन वेळा असेही झाले की, त्याने मेसेज करून मला विचारले की, तू कधी जोरदार पुनरागमन करणार आहे. याच गोष्टीमुळे माझा जुना फॉर्म परत आला. धोनीकडे मी नेहमीच एक आत्मविश्वास असेलला आणि मानसिक दृष्ट्या खूप मजबूत व्यक्त म्हणून पाहिले आहे,” असे विराट पुढे म्हणाला. दरम्यान, विराट सध्या भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

Virat Kohli on EatSure Presents RCB Podcast Full Episode | Game Changers

(‘I was always considered a failed captain’, Virat Kohli also spoke about his relation with Dhoni)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने निवडला भक्कम संघ, WTCच्या फायनलवर डोळा
‘बीसीसीआयने तुम्हाला समान मानधन दिले, तरीही तुम्ही…’, हरमनसेनेवर भडकल्या भारताच्या माजी कर्णधार

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---