आयपीएल 2021 स्पर्धेदरम्यान खेळाडूंना बायो बबलमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे यावर्षीची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल संघाचा फिरकीपटू अक्षर पटेल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता व त्यामुळे त्याला संघाचे सुरुवातीचे 4 सामने खेळता आले नव्हते. अलीकडेच अक्षरने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरचे आपले अनुभव सांगितले आहेत.
अक्षरने सांगितले की, त्याच्या मनात विचार येत होते की आपण कोरोनातून बरे झाल्यावर कामगिरीवर काही फरक तर पडणार नाही ना. अक्षर म्हणाला, “माझ्या मनात बरेच विचार येत होते. मी चांगल्या फॉर्ममध्ये होतो आणि मग अचानक मला कोरोना झाला. मला भीती वाटत होती की, कोरोना माझ्या लयीवर कसा परिणाम करेल. कोरोनाशी लढा दिल्यानंतर माझे शरीर मला साथ देईल याबद्दल विचार येत होते. पण पहिल्याच सामन्यातच माझ्या शरीराची चाचणी होणार होती, कारण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मी सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी केली होती. त्या सामन्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला, कारण माझी लय अबाधित होती.”
कोरोना विरुद्ध लढा दिल्यानंतरही अक्षरने आयपीएल 2021 स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने खेळलेल्या 4 सामन्यात 6 बळी मिळवले होते. विशेष म्हणजे या चारही सामन्यात त्याने अतिशय कंजूस गोलंदाजी केली होती. दिल्ली कॅपिटलच्या आयपीएल 2021 मधील शानदार कामगिरीत अक्षरचे मोठे योगदान होते.अक्षरला त्याच्या या शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले, व त्याची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर 18 जून ते 22 जून दरम्यान न्युझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मालिका खेळणार आहे. या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात अक्षर कडे स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की अक्षरला जर अंतिम 11 मध्ये संधी मिळाली तर तो कशा प्रकारची कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन दिवसात दोन माजी क्रिकेटपटूंचे निधन, भारतीय क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा
मी फक्त एकाच टी२० सामन्यात चांगली कामगिरी केली नाही
काय सांगता!! अजिंक्य रहाणेला भर गर्दीत चाहत्याने केले होते कीस, व्हिडिओ भन्नाट व्हायरल