---Advertisement---

या कारणामुळे झुलन गोस्वामीने घेतली टी20 क्रिकेटमधून निवृत्ती

On: शुक्रवार, ऑगस्ट 24, 2018 6:15 PM
---Advertisement---

भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने गुरुवारी (23 आॅगस्ट) आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. हा तिचा वयक्तिक निर्णय असल्याचे तिने सांगितले असून वाढते वयही साथ देत नसल्याचे ती म्हणाली.

गोस्वामीने टी20 मधून निवृत्तीबद्दल सांगितले की “हा एका रात्रीत झालेला निर्णय नाही. मी काहीकाळापासून याचा विचार करत होते.”

“मी टी20 खेळण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहीत करु शकले नाही. हा खेळ वेगवान होत आहे. मी दोन्ही प्रकारात माझे सर्वोत्तम योगदान देऊ शकत नाही. मला वाटते वाढत्या वयामुळे मी यात आणखी काही देऊ शकत नाही. ”

“क्रिकेट कठिण खेळ होऊ लागला आहे आणि मला जाणवत आहे की माझे शरीरही दुखापतीतून सावरण्यास वेळ घेत आहे. दुखापत ही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा एक भाग आहे. तूम्हाला त्याचा सामना करावाच लागतो. पण माझ्यावर या निर्णयासाठी कोणाचाही दबाव नव्हता. हा माझा वयक्तिक निर्णय आहे.”

भारतीय महिला संघाची श्रीलंकेविरुद्ध 19 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे.

या संघाबद्दल बोलताना गोस्वामी म्हणाली, “मी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीचा संघ पाहिला आहे. यात खूप प्रतिभा आहे आणि माझी खात्री आहे की कोणीतरी या संधीचा मोठा उपयोग करेल.”

“संघात खूप चांगले खेळाडू आहेत. त्यातील त्यांना माझी जागा घेण्यारी खेळाडू मिळेल की नाही माहित नाही पण मला खात्री आहे संघात जी प्रतिभा आहे त्यावरुन मला वाटते आम्ही संघ म्हणून पुढेही चांगले खेळू”

गोस्वामीने भारताकडून 68 टी20 सामने खेळले असून यात तीने 56 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ती भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे.

तिने जरी टी20 निवृत्ती स्विकारली असली तरी बीसीसीआयने ती वनडेमध्ये पुढे खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोस्वामीच्या अनुपस्थित श्रीलंकेविरुद्ध हरमनप्रीत कौर भारताचे टी20मध्ये नेतृत्व करणार आहे. तर शिखा पांडेकडे वेगवान गोलंदाजीची मुख्य जबाबदारी असेल. यात तिला मानसी जोशी आणि पुजा वस्त्राकर साथ देतील. त्याचबरोबर अरुंधती रॉयचीही भारतीय संघात निवड झाली आहे.
भारतीय संघ श्रीलंका आणि विंडिज विरुद्धच्या सामन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड येथे होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकात खेळणार आहे.

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सामनावीर कोहलीने शॅम्पेनची बॉटल दिली शास्त्रींना भेट

एशियन गेम्स: हिना सिद्धूला नेमबाजीत कांस्यपदक

विराट कोहलीप्रमाणेच हार्दिक पंड्याही होता सामनावीराचा तितकाच दावेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment