इंग्लंड विरुद्ध नॉटिंघम कसोटी सामन्यासाठी अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे भारताचा माजी दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणने फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणतो की, तो आश्विनला नेहमी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल कारण तो आक्रमक पर्याय आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी संभाषणादरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, इंग्लंडच्या या फलंदाजीसमोर रविचंद्रन अश्विन हा एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकले असते. तो म्हणाला की, “जर आपण अश्विनच्या निवडीबद्दल बोललो, तर मी पावसाची शक्यता असूनही त्याला संघात ठेवले असते. तो एक मॅच विनर खेळाडू आहे आणि खूप प्रभाव पाडतो. भारतीय संघाला चार आक्रमक गोलंदाजांची गरज आहे आणि रन-रेट तपासण्यासाठी जडेजा तुमचा पाचवा गोलंदाज असू शकतो. जर अश्विन या सामन्यात खेळत असता, तर भारतासाठी अधिक संधी असती आणि मधल्या षटकांमध्ये देखील परिस्थिती वेगळी असती.”
रविचंद्रन अश्विनला पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नाही मिळाली
जेव्हा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा अश्विनचे नाव त्यात समाविष्ट नव्हते. अश्विनच्या जागी जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आणि त्याबद्दल बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया देखील उमटल्या.
अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करायला हवा होता, असे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचे म्हणणे होते. तो म्हणाला होता की, “भारतीय संघाने अश्विनला खेळण्याची संधी दिलीच पाहिजे. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नजर टाकली, तर त्याने उत्तम कामगिरी केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याने जडेजापेक्षा चांगली गोलंदाजी केली. मग तुम्ही त्याला कसे बाहेर ठेवू शकता. कसोटी मालिकेतील हा पहिला सामना असून त्याला संधी मिळायला हवी होती.”
भारतीय माजी खेळाडू वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनीही अश्विनच्या अनुपस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि ट्विटद्वारे आपले मत व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ENG vs IND 1st Test: नॉटिंघम कसोटी अनिर्णित; पावसामुळे अखेरचा दिवसाचा खेळ झाला रद्द
-नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यावर भारतीय क्रिकेट संघाने केली ‘ही’ गोष्ट; ‘बुम बुम बुमराह’चे वक्तव्य
-भारताविरुद्धच्या कसोटीसाठी ‘त्या’ गोष्टींचा सर्वाधिक फायदा झाला, जो रुटचा खुलासा