भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिकने आपल्या रणनितीविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी हार्दिकने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला या पत्रकार परिषदेत संघाच्या रणनितीविषयी प्रश्न विचारला गेला. याबाबत बोलताना तो म्हणाला,
“या मालिकेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. त्यांना पूर्णपणे संधी देणे माझी जबाबदारी असेल. जेणेकरून त्यांना विश्वास होईल की ते या स्तरावर खेळण्यासाठी नक्कीच पात्र आहेत.”
हार्दिक याला टी20 संघाचा नियमित कर्णधार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच याबाबतची घोषणा देखील होऊ शकते. तत्पूर्वी, त्याला कर्णधार म्हणून पुरेसा अनुभव देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. यापूर्वी देखील त्याला आयर्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी कर्णधार म्हणून संधी दिली गेलेली. या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला.
मालिकेतही अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. 2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेविरुद्ध मुकेश कुमार व शिवम मावी हे प्रथमच भारतीय संघाचा भाग झाले आहेत. तसेच, राहुल त्रिपाठी व शुबमन यांना देखील या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
(I Will Give Full Support To All Players Hardik Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपचे कौतुक केल्यामुळे दिनेश कार्तिक अडचणीत, प्रशिक्षकांनीच केले आरसा दाखवण्याचे काम
जबरदस्त योगायोग! ‘या’ फलंदाजाने ठोकले 2022 आणि 2023चे पहिले आंतरराष्ट्रीय शतक, केल्या सारख्याच धावा