---Advertisement---

अर्शदीप सिंगला टी२० विश्वचषकासाठी संघात घ्याच! माजी प्रशिक्षक शास्त्री गुरूजींचा टीम इंडियाला सल्ला

On: रविवार, ऑगस्ट 7, 2022 7:03 PM
Arshdeep-Singh-Celebration
---Advertisement---

भारतीय पुरूष क्रिकेट संघात सध्या अनेक खेळाडूंनी पदार्पण केले आहे. त्यातील काही जण उत्तम कामगिरी करत संघातील जागा पक्की करण्यासाठी धडपडत आहेत. तसेच ज्या युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे, त्यांच्या कामगिरीवर आजीमाजी खेळाडूंचे लक्ष आहे. भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने जेव्हापासून भारतीय संघात पदार्पण केले आहे, तेव्हापासून तो उत्तम गोलंदाजी करत आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही त्याने त्याच्या गोलंदाजीने  सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्याने त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात ४ षटके टाकताना २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. नंतर त्याने किट्स येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये  डेथ ओव्हर्स विशेष कामगिरी करत सामन्याला २०व्या षटकापर्यंत नेले होते. तसेच चौथ्या टी२०मध्येही अप्रतिम गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.

अर्शदीपच्या गोलंदाजीत विविधता आहे- रवी शास्त्री

अर्शदीपच्या या कामगिरीमुळे त्याला आगामी टी२० विश्वचषकात संघामध्ये घेतले जावे, अशी मागणी होत आहे. रवी शास्त्री (Ravi Sharstri) यांच्यामते त्याला संघात घेणे आवश्यक आहे.

चौथ्या टी२० सामन्यावेळी शास्त्रींनी पॅनकोडशी बोलताना म्हटले, “अर्शदीप हा त्याच्या गोलंदाजीतून विविधता घेऊन येतो. तो वेगळ्या प्रकारचा बाउंस टाकतो. तो भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमकांपैकी एक असून त्यासाठी तो परिपूर्ण आहे.”

“भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे पण संघात हवे आहेत. जर यामध्ये अर्शदीप संघात असला तर त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याच्यासाठी एकाला संघाबाहेर ठेवावे लागले तरी चालणार आहे. जर ४ वेगवान गोलंदाज आहेत, तर त्यातील ३ डाव्या हाताचे आणि एक उजव्या हाताचा अशा गोलंदाजांची निवड करेल. तुमच्याकडे हार्दिक पंड्याच्या रूपात एक अष्टपैलू खेळाडू आहेच,” असेही शास्त्री यांनी पुढे म्हटले आहे.

अर्शदीपने आतापर्यंत खेळलेल्या ५ टी२० सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

CWG: बॅडमिंटनमध्ये ‘कभी खुशी कभी गम’! युवा लक्ष्य फायनलमध्ये; श्रीकांतच्या पदरी निराशा

CWG 2022: वडिलांनी टाकली नोकरी संकटात! नीतूनं गोल्ड मेडल मिळवत साकारले स्वप्न

तुमसे ना हो पाएगा! दीपक हुड्डाच्या ‘फ्लॉप शो’मुळे भडकले फॅन्स, घेतला चांगलाच समाचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---