भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
अजिंक्यच्या या नेतृत्व क्षमतेने जगभरातील सर्वच क्रिकेट रसिकांना भुरळ घातली आहे. अशातच इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी अजिंक्यला कसोटी कर्णधारपद देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वॉन यांनी लिहले,” मला खरोखरच वाटते की अजिंक्यला कसोटी कर्णधारपद देण्यासंदर्भात विचार करावा. बीसीसीआयने देखील या संदर्भात विचार करणे गरजेचे आहे. विराट कोहली एक फलंदाज म्हणूनही उत्तम कामगिरी करू शकतो. अजिंक्य एक उत्तम रणनीती आखणारा कर्णधार आहे.”
I think I would have really considered keeping @ajinkyarahane88 as Captain for @BCCI !!! Allowing @imVkohli to be the Batsman only would make India even more dangerous & Rahane has an incredible presence & tactical nous about him … #INDvsAUS
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 19, 2021
इंग्लंडचे आणखी एक माजी खेळाडू निक कॉमटन यांनी देखील अजिंक्यला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. कॉमटन म्हणाले,” कृपया अजिंक्यला कर्णधार बनवा. तो शांत असतो व समंजसपणे नेतृत्व करतो. खेळाडू त्याच्यासोबत आणखीन जास्त उत्तम कामगिरी करू शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक
ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’
दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत बांगलादेशची मालिकेत विजयी आघाडी