---Advertisement---

दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 12:04 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक खेळाडू ॲलेक्स कॅरीने नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमधील सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सने या सामन्याच्या एक दिवस आधीच कॅरीला आपल्या संघातून वगळले होते.

बिग बॅश लीग मधील 46 व्या सामन्यात ॲलेक्स कॅरीने ऍडीलेड स्ट्राइकर्सकडून खेळताना ब्रिस्बेन हिट विरुद्ध शतकीय खेळी केली. कॅरीने 62 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 101 धावांची आक्रमक खेळी केली. कॅरीच्या या शतकीय खेळीमुळे ऍडीलेड स्ट्राइकर्सने सामन्यात सहज विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऍडीलेडने, कॅरीच्या शानदार शतकीय खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावत 197 धावांपर्यंत मजल मारली. ब्रिस्बेन हिटकडून लॅब्यूशेनने 20 धावा देत 2 गडी बाद केले. 198 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच ब्रिस्बेन संघावर दबाव जाणवत होता व संपूर्ण संघ 17.3 षटकात 115 धावांवर बाद झाला. ऍडीलेड स्ट्राइकर्सकडून वेस एगरने 4 तर पिटर सिडलने 3 गडी बाद केले.

दिल्लीकडून कॅरीची कामगिरी –

कॅरीने दिल्ली कॅपिटल्सकडून 3 सामने खेळलेले आहेत. मात्र, त्याला यात विशेष कामगिरी करता न आल्याने दिल्लीने 2021 आयपीएलसाठी त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्याने 3 सामन्यात 32 धावाच केल्या होत्या. मात्र कॅरीने हे शतक झळकावत इतर आयपीएल संघांना आपली क्षमता दाखवून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’

दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत बांगलादेशची मालिकेत विजयी आघाडी

ठरलं! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव ‘या’ तारखेला होणार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---