---Advertisement---

हनुमा विहारीने या व्यक्तीला केले पहिले शतक समर्पित, पहा व्हिडिओ

---Advertisement---

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या आहेत. यामध्ये हनुमा विहारीने शतकी खेळी केली आहे.

विहारीने 225 चेंडूत 111 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 16 चौकार मारले. विहारीचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. हे शतक विहारीने त्याच्या वडीलांना समर्पित केले आहे. तो 12 वर्षांचा असताना त्याच्या वडीलांचे निधन झाले होते.

विहारी काल(31ऑगस्ट) या सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर म्हणाला, ‘माझ्या वडीलांचे मी 12 वर्षांचा असताना निधन झाले होते. तेव्हापासून मी ठरवले होते की जेव्हापण मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल तेव्हा माझे पहिले शतक त्यांना समर्पित करेल.’

‘आज खूप भावनिक दिवस आहे आणि मला आशा आहे की ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना अभिमान वाटत असेल. मला आनंद आहे की मी हे मिळवले आहे.’

विहारीचा हा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विहारीने हे शतक करताना रिषभ पंतबरोबर(27) 6 व्या विकेटसाठी 62 धावांची अर्धशतकी तर इशांत शर्माबरोबर(57) 8 व्या विकेटसाठी 112 धावांची शतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताला 400 धावांचा टप्पा पार करता आला.

या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 7 बाद 87 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

बुमराह म्हणतो, विराटमुळे मला हॅट्रिक मिळाली, पहा व्हिडिओ

कसोटी कारकिर्दीत पहिले शतक करताच हनुमा विहारीला मिळाले या दिग्गजांच्या लिस्टमध्ये स्थान

१३ वर्षांनंतर जसप्रीत बुमराहने केला तो खास कारनामा, झाला या खास यादीत समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment