---Advertisement---

लॉर्ड्स ठरणार विराटसाठी प्रेरणादायी; लवकरच झळकावणार शतक, दिग्गज इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 12:58 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला होता. ज्यामुळे हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला होता. तसेच या मालिकेतील दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरलेला विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावेल असे वक्तव्य माजी इंग्लिश कर्णधाराने केले आहे.

माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन यांनी क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “विराट कोहलीला गेल्या काही महिन्यांपासून शतक झळकावण्यात अपयश येत आहे. परंतु, लॉर्ड्सचे मैदान खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम करते. जेव्हा खेळाडू ग्रेस गेट मधून बाहेर येत असतात, तेव्हा त्यांच्या मानेला मुंग्या आल्याशिवाय राहत नाही. महान खेळाडू महान मैदांनावरून प्रेरित होत असतात. जर विराटने या सामन्यात शतक झळकावून बॅट उंचावली तर मला आश्चर्य वाटणार नाही.”

विराटने २०१९ मध्ये झळकावले होते शेवटचे शतक
विराटने गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटच्या तीनही प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. विराटने आपले शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याला क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक झळकावता आले नाही.(I would not surprised if Virat Kohli will score century at lord’s)

लॉर्ड्सच्या मैदानावर निराशाजनक कामगिरी
लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक भारतीय चाहत्यांना विराट कोहली शतक झळकावेल अशी अपेक्षा असणार आहे. परंतु, विराट कोहलीला आतापर्यंत लॉर्ड्सच्या मैदानावर साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याने आतापर्यंत लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण चार डावात ६५ धावा केल्या आहेत. या दरम्यान २५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शार्दुल ठाकूर लॉर्ड्स कसोटीतून बाहेर होताच वसीम जाफरने केलेलं ‘भन्नाट’ ट्विट होतंय तुफान व्हायरल

लॉर्ड्सवर कर्णधार म्हणून कोहली करणार ‘ही’ विराट कामगिरी

ग्रेट भेट! सचिन तेंडुलकरने ‘रौप्यपदक’ विजेत्या मीराबाई चानूशी साधला संपर्क; ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---