---Advertisement---

खेळाडूंच्या सर्वोच्च संघटनेकडून साहाला समर्थन; सार्वजनिक पत्र लिहीत म्हटले…

On: मंगळवार, फेब्रुवारी 22, 2022 9:31 PM
wriddhiman-saha
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (wriddhiman saha) याने एका पत्रकाराला मुलाखत दिली नाही. त्यामुळे त्या पत्रकाराकडून त्याला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर क्रिकेट जगतात गोंधळ निर्माण झाला आहे. बीसीसीआय या पत्रकाराचे नाव शोधण्याचा प्रयत्नात आहे. अशातच भारतीय क्रिकेट असोसिएशन (ICA) रिद्धिमान साहाच्या बाजून उभे राहिले आहे. आयसीएने त्या पत्रकाराची मान्यता रद्द करण्याचीही मागणी केली आहे.

आयसीएने साहाच्या मुद्यावर बोलताना सांगितले की, “आयसीएस एका पत्रकाराकडून साहाला दिल्या गेलेल्या धमकीचा निषेध करते आणि आम्ही बोर्डच्या त्या निर्णयाचा सन्मान करतो, ज्यामध्ये त्यांनी पत्रकाराविरोधात चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बोर्डकडे पत्रकाराविरोधात कडक कारवाईची मागणी करत आहोत.”

“आम्हाला ही गोष्ट समजते की, आमचा खेळ आणि खेळाडू यांच्यासाठी मीडिया एक महत्वाची भूमिका पार पाडत असते. मात्र, कोणीच स्वतःची सीमा पार नाही केली पाहिजे. साहासोबत जे काही झाले, ते स्वीकारण्यायोग्य अजिबातच नाहीय. अशात सर्व संस्थांना विनंती आहे की, त्यांनी सुनिश्चित करावे की, पुढे कधी असे होऊ नये.” असे पुढे सांगितले गेले

आयसीए अध्यक्ष अशोक मल्होत्रां या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, “आमचा उद्देश क्रिकेटपटूंच्या हितासाठी काम करणे आहे आणि आम्ही कोणाकडूनच अशा प्रकारच्या व्यवहाराला योग्य ठरवत नाही. मग तो पत्रकार असो किंवा इतर कोणी. मी साहाला विनंती करतो की, त्याने पत्रकाराचे नाव पब्लिक डोमेनमध्ये आणावे. आम्ही त्याच्या सोबत आहोत.”

दरम्यान, रिद्धिमान साहाने त्याला मिळालेल्या या धमकीची माहिती ट्वीटर पोस्टच्या माध्यमातून दिली होती. पत्रकाराने त्याला वॉट्सअपच्या मध्यमातून संपर्क साधला होता आणि त्याच ठिकाणी धमकावले देखील होते. या वॉट्सअप चॅटचा स्क्रिनशॉट साहाने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला. मात्र, पत्रकाराचे नाव मात्र सांगितले नाही. एका वृत्तपत्राशी बोलताना, आपण पत्रकाराचे नाव उघड करणार नसल्याचे साहाने सांगितेल आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्सची वाढली चिंता! कोट्यावधी रुपये खर्चून घेतलेला ‘तो’ फलंदाज ठरतोय पूरता फ्लॉप

नव्या वादाला फुटले तोंड! क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ निर्णयाने आयपीएल फ्रॅंचाईजी नाराज

PHOTO: विश्रांतीच्या काळात रिषभ आजमवतोय ‘या’ खेळात हात; चाहते म्हणाले..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---