येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022पूर्वी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विश्वचषकापूर्वी सध्या वॉर्म- अप सामने म्हणजेच सराव सामने खेळले जात आहेत. मात्र, मागील चार सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांमध्ये एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. यापूर्वी बुधवारी खेळला जाणारा सराव सामना पावसामुळे झाला नाही. त्यामुळे या सामन्यांमध्ये सामील असणाऱ्या सर्व संघांना झटका बसला. सामने रद्द झाल्यामुळे संघांना लयीत येण्याची संधी भेटली नाही. आता विश्वचषकापूर्वीच्या त्यांच्या तयारीवर याचा परिणाम होऊ शकतो.
बुधवारी (दि. 12 ऑक्टोबर) पाचवा सराव सामना वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड्स (West Indies vs Netherlands) संघात खेळला जाणार होता. या सामन्यात पावसाने रोडा घातला आणि त्यामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय, तर नेदरलँड्सचा पराभव झाला होता.
यानंतर सहावा सराव सामना झिम्बाब्वे विरुद्ध नामीबिया संघात होणार होता. दोन्ही संघांचा हा दुसरा सराव सामना होता. झिम्बाब्वे संघाला त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात श्रीलंका संघाकडून 33 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. तसेच, नामीबियाने आयर्लंडला 11 धावांनी पराभूत केले होते.
सातवा सराव सामना श्रीलंका विरुद्ध आयर्लंड संघात खेळला जाणार होता. मात्र, हा सामनाही पावसामुळे रद्द झाला. श्रीलंका संघ पहिल्या सामन्यात विजयी झाला होता, तर आयर्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच, आजच्या तिसऱ्या आणि स्पर्धेच्या आठव्या सराव सामन्यात स्कॉटलंड आणि यूएई संघ एकमेकांच्या आमने-सामने होता. स्कॉटलंडने त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता, तर यूएईला पराभूत व्हावे लागले होते. हा सामनादेखील नाणेफेकीशिवाय रद्द झाला.
पहिली फेरी खेळणाऱ्या सर्व संघांनी त्यांचे वॉर्म अप सामने खेळले आहेत. दुसरीकडे, सुपर 12मध्ये जागा मिळवणाऱ्या 8 संघांमध्ये 17 ऑगस्टपासून सराव सामने खेळले जातील.
टी20 विश्वचषक 2022मधील सराव सामन्यांचे वेळापत्रक
17 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, गाबा (सकाळी- 9.30 वाजता)
17 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऍलन बॉर्डर फील्ड (सकाळी- 9.30 वाजता)
17 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, गाबा (दुपारी 1:30 वाजता)
17 ऑक्टोबर- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, ऍलन बॉर्डर फील्ड (दुपारी 1:30 वाजता)
19 ऑक्टोबर- अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, गाबा (सकाळी 8:30 वाजता)
19 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऍलन बॉर्डर फील्ड (दुपारी 1:30 वाजता)
19 ऑक्टोबर- न्यूजीलंड विरुद्ध भारत, गाबा (दुपारी 1:30 वाजता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर…’
जयस्वालचा षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर, गोलंदाजही पाहतच राहिला; पठ्ठ्याने स्वत:च शेअर केला व्हिडिओ