आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20विश्वचषकाच्या (T20 World Cup)उपांत्य फेरी सामन्यांच्या काही दिवसाचा अवधी असतना आयसीसीने मंगळवारी (8 नोव्हेंबर) महत्वाची घोषणा केली आहे. आयसीसीने तीन दिग्गज खेळाडूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल, पाकिस्तानचा अब्दुल कादिर आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू चार्लोट एडवर्ड्स यांचा समावेश केला आहे.
वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू
शिवनारायन चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul) याने तब्बल 21 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्याने 164 कसोटी सामने खेळताना 51.37च्या सरासरीने 11867 कसोटी धावा केल्या असून त्यामध्ये 30 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 268 वनडे सामन्यांमध्ये 41.60च्या सरासरीने खेळताना 11 शतके आणि 59 अर्धशतकांच्या सहाय्याने 8778 धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा आणि शतके ब्रायन लाराच्या नावावर आहेत, त्यानंतर चंद्रपॉलचा क्रमांक लागतो. चंद्रपॉल हा त्यांच्या फलंदाजीचे कौशल्यासाठी ओळखला जातो. त्याचा बॅटींग स्टान्स पाहून भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरते. त्याचबरोबर त्याची कसोटीमधील सरासरी विव रिचर्ड्स यांच्यापेक्षा अधिक आहे. रिचर्ड्स यांची कसोटीतील सरासरी 50.23 इतकी आहे.
“हा सन्मान मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांकडून शिकलो,” असे चंद्रपॉलने आयसीसीशी बोलताना म्हटले.
इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकून देणारी
इंग्लंडची माजी कर्णधार आणि वरच्या फळीतील फलंदाज चार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) हिला पण आयसीसीने हॉल ऑफ फ्रेममध्ये समाविष्ट केले आहे. तिने 1996-2016च्या काळात इंग्लंडकडून 23 कसोटी, 191 वनडे आणि 95 टी20 सामने खेळले. यामध्ये तिने कसोटीमध्ये 44.10च्या सरासरीने 1676 धावा, वनडेत 38.16च्या सरासरीने 5992 धावा आणि टी20मध्ये 32.97च्या सरासरीने 2605 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने 75 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या.
एडवर्ड्ससाठी 2009चा काळ उत्तम राहिला. या काळात इंग्लंडने तिच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला. त्यानंतर तिच्याच नेतृत्वाखाली संघाने पदार्पणातच टी20 विश्वचषकही जिंकला. तसेच ती इंग्लंडकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारी आणि त्या प्रकारात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
“मला माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रत्येक क्षण आवडला आणि आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,” असे एडवर्ड्सने म्हटले.
पाकिस्तानचा ‘जादुई गोलंदाज’ अब्दुल कादिर ज्याला पाहून वॉर्नला मिळाली प्रेरणा
अब्दुल कादिर (Abdul Qadir) पाकिस्तानच्या या फिरकीपटूने त्याच्या (1977-93) या 13 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 67 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 236 आणि 132 विकेट्स घेतल्या. त्याचा मुलगा उस्मान याने आयसीसीने त्याच्या दिवगंत पित्याला हा सन्मान दिल्याबद्दल आभार मानले आहे. सध्या उस्मान हा पाकिस्तानच्या संघात आहे.
कादिर यांच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (Shane Warne) देखील प्रेरीत झाला होता. 1980चा काळ होता तो, तेव्हा वॉर्न कादिर यांची गोलंदाजी टिव्हीवर पाहत असे. पुढे त्याने कशी उत्तम कामगिरी केली हे जगजाहिर आहेच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?