Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग

वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग

November 8, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
IND-vs-NED

Photo Courtesy: Twitter/BCCI


पायामध्ये क्रॅम्प आणि ताठ पाठ हे प्रत्येक क्रीडापटूचे स्पर्धेपूर्वीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 खेळला जाणार, त्याआधीच वेगवान गोलंदाजांना पूरक अशा खेळपट्ट्या असे रिपोर्ट्स पुढे येऊ लागले. त्यामुळे प्रत्येक संघ त्यांच्या वेगवान गोलंदाजांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेऊ लागले. त्यातच भारतीय क्रिकेट संघाने आपल्या वेगवान गोलंदाजांना आराम मिळण्यासाठी त्याच्यापुढची शक्कल लढवली आहे.

पुरूष क्रिकेट संघाचा आठवा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात सुरू आहे. यामुळे सामन्यांसाठी खेळाडूंना विमानांचा प्रवास अधिक करावा लागत आहे. यावेळी प्रवासात वेगवान गोलंदाजांना आराम मिळावा यासाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी त्यांच्या बिझनेस सीट्स मोहम्मद शमी (Mohammed Shami), अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांना दिल्या. गोलंदाजांच्या पायांना आराम मिळेल म्हणून ही सोय केली गेली.

“स्पर्धेपूर्वीच आम्ही ठरवले होते की वेगवान गोलंदाजांना सर्वाधिक वेळ मैदानावार घालवायचा असतो. त्यामुळे त्यांना पाय स्ट्रेच करण्यासाठी अधिक जागा मिळावी यासाठी हे केले गेले,” असे एका सपोर्ट स्टाफने सांगितले. जेव्हा भारतीय संघ उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास ऍडलेडला पोहोचला तेव्हा सपोर्ट स्टाफने ही माहिती माध्यमांना दिली.

आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक संघाना बिझनेस क्लासच्या चार सीट मिळतात. त्या सीट्स खेळाडू शक्यतो मुख्य प्रशिक्षक, कर्णधार आणि महत्वाच्या खेळाडूंना देतात. तेव्हा भारतीय खेळाडूंनी विचार केला की आपल्याला प्रत्येक तीन ते चार दिवसांमध्ये प्रवास करायचा आहे, तर जे अधिक मेहनत घेतात त्यांना अधिक आराम असे समीकरण डोक्यात ठेवत वेगवान गोलंदाजांना त्या सीट्स दिल्या.

ही स्पर्धा संपते तोपर्यंत भारतीय संघाने 34000 किमी प्रवास केला असेल. त्याचबरोबर संघाने जेव्हा पाकिस्तानविरुद्ध थरारक विजय मिळवला तेव्हा खेळाडूंनी सेलेब्रेशनही केले नव्हते कारण त्यांना प्रवास करायचा होता, अशी माहिती समोर आली.

या स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडविरुद्ध 10 नोव्हेंबरला ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाचे नेतृत्व धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी रोहित शर्माना दुखापत
टीम इंडियाने या गोष्टींवर द्यायला हवं लक्ष! नाहीतर सेमी-फायनलमध्ये चुकवावी लागेल मोठी किंमत


Next Post
tim southee

टिम साउदीने ओळखली पाकिस्तानची ताकत, उपांत्य सामन्याआधी न्यूझीलंडला केले सावध

Shivnarine Chanderpaul

शिवनारायन चंद्रपॉलसह 'या' दोन महान खेळाडूंचा 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, पाकिस्तानचा खेळाडूही सामील

ROHIT BABAR kane jos

सेमीफायनलिस्ट कर्णधारांपैकी पाहा कोण आहे सर्वात फ्लॅाप? रोहित, विलियम्सन, बाबर की बटलर?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143