---Advertisement---

टीम इंडियाने या गोष्टींवर द्यायला हवं लक्ष! नाहीतर सेमी-फायनलमध्ये चुकवावी लागेल मोठी किंमत

On: मंगळवार, नोव्हेंबर 8, 2022 12:37 AM
Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत, टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरी धडक मारली आहे. भारताचे फलंदाज आणि गोलंदाज या विश्वचषकात लयीमध्ये दिसतायेत. भारतीय संघाला आतापर्यंत यश मिळत असले तरी, काही अशा गोष्टी आहेत त्यांच्यावर संघ व्यवस्थापनाला काम करावे लागेल.

रोहितचे अपयश

विश्वचषकात भारतीय संघ यशस्वी ठरत असला तरी, कर्णधार रोहित शर्माचे अपयश नजरेत भरत आहे. स्पर्धेत केवळ नेदरलँड्सविरूद्ध अर्धशतक साजरे करू शकला. त्यामुळे उपांत्य फेरी व त्यानंतर अंतिम फेरीत भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

हार्दिकचे फलंदाजीतील योगदान

प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्याने केवळ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीची झलक दाखवली होती. मात्र, त्यानंतर तो तितका प्रभावी वाटला नाही. परंतु, गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने संघासाठी निर्णायक योगदान दिले आहे.

यष्टीरक्षकांचे अपयश

भारतीय संघ व्यवस्थापनापुढे सर्वात मोठी चिंता असेल ती म्हणजे यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी द्यायची? दिनेश कार्तिक हा चार सामन्यात अपयशी ठरला होता. तर, झिम्बाब्वेविरूद्ध संधी मिळालेला रिषभ पंत हा देखील आपली छाप पाडू शकला नव्हता.

फिरकी विभाग चिंतेचा विषय
भारत उपांत्य फेरीत पोहचला आहे, पण एक कमकुवत बाजू ही आहे की भारताकडे विकेट्स मिळवून देणारे फिरकीपटू नाहीत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी त्यांचे पाच फलंदाज अवघ्या 40 धावांवर तंबूत पाठवलेले. मात्र, जेव्हा फिरकीपटूंची षटके सुरू झाली तेव्हा त्यांनी 50 पेक्षा अधिक धावा करत धावफलक चालता ठेवला. रविचंद्रन अश्विन यशस्वी ठरत असला तरी, प्रमुख संघाविरुद्ध त्याची कामगिरी तितकी उल्लेखनीय झाली नाही. त्याला साथ देणारा अक्षर पटेल महागडा ठरताना दिसतोय.

त्यामुळे भारताला जर हा उपांत्य फेरीचा सामना जिंकायचा असेल तर या सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमी-फायनलमध्ये भारत घेणार 13 वर्षाआधीचा बदला? इंग्लंडने दिलेला ‘जोर का झटका’
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “सेमी-फायनलमध्ये रिषभ टीम इंडियाचा एक्स फॅक्टर ठरेल”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---