---Advertisement---

सेमी-फायनलमध्ये भारत घेणार 13 वर्षाआधीचा बदला? इंग्लंडने दिलेला ‘जोर का झटका’

On: सोमवार, नोव्हेंबर 7, 2022 10:14 PM
India vs England
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने आपल्या धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाशी दोन हात करेल. हा सामना विराट कोहली याच्या आवडत्या मैदानांपैकी एक असलेल्या ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ ऍडिलेड येथे पोहचला असून, या ठिकाणी भारतीय संघाने आपला 13 वर्षापुर्वीचा बदला घेण्यासाठी कंबर कसली आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) या संघांमध्ये टी20 विश्वचषकाचा हा सामना येत्या गुरूवारी (10 नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे. याच मैदानावर भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये सामना खेळवला गेलेला ज्यात भारतानेे बांगलादेशवर विजय मिळवलेला. विराट कोहली ( Virat Kohli ) याने या सामन्यात 64 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने गट-2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान होऊन उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच इंग्लंडचा संघ गट-1 मध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. या दोन संघांव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि पाकिस्तान देखील उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

13 वर्ष जुन्या हिशोबाची परतफेड
भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये विश्वचषकात खुप कमी सामने खेळले गेले आहेत. या संघामध्ये झालेला एक सामना तर सर्वांनाच आठवत असेल. हा सामना 2007 मध्ये पहिल्या विश्वचषकात खेळला गेलेला. या सामन्यात युवराज सिंह (Yuvraj Singh) याने स्टुअर्ट ब्रॉड याच्या एकाच षटकात 6 षटकार मारले होते. यानंतर 2009 मध्ये दोन्ही संघ टी20 विश्वचषकात एकमेकांना भिडले.

या सामन्यात इंग्लंडने भारताला अवघ्या 3 धावांनी पराभूत केले होते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 7 गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा केलेल्या. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 150 धावाच करता आल्या. या पराभवामुळे भारतीय संघाला गतविजेते असताना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो संघात असणे म्हणजे हत्ती पोसण्यासारखे’; दिग्गजाचे बवुमावर जहरी टीकास्त्र
VIDEO: ‘बस झाले’, चाहत्यांना पाहून विराटने जोडले हात; कोहलीची क्यूट रिऍक्शन व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---