Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संघाचे नेतृत्व धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत

भारतीय संघाचे नेतृत्व धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत

November 8, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाला 10 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळायचा आहे. उपांत्य सामन्यात भारतासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान आहे. संघ या सामन्यासाठी एडिलेड ओव्हलवर दाखल झाला असून कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. संघाच्या सराव सत्रादरम्यान रोहितच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषकात वैयक्तिक काही खास खेळी करू शकला नाही. पण नेतृत्वाच्या बाबतीत त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याच्याच नेतृत्वात संघाने चालू विश्वषचषक स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघ ग्रुप दोनमध्ये भारतीय संघ 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. रोहितळा उपांत्य सामन्यापूर्वी दुखापत झाली अशली तरी, त्याने दुखापतीनंतर काही वेळाने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केल्याचेही सांगितले जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार रोहितची दुखापत जास्त गंभीर नाहीये. दुखापतीनंतर स्वतः रोहित देखील काही वेळ वेदनेत दिसला, पण त्याने काही वेळानंतर पुन्हा मैदानात पुनरागमन केले. अशात तो इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळतो की नाही, हे लवकरच समजू शकते. चाहत्यांना त्याच्या दुखापतीमुळे चिंता लागली आहे.

उपांत्य सामन्यांची समीकरणे –
दरम्यान, भारतासह, ग्रुप दोनमध्यून पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारतीय संघाने ग्रुप दोनमध्ये पहिल्या, पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. भारताने पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला. तर पाकिस्तान संघाने भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध पराभव स्वीकार पाच पैकी तीन विजय मिळवले.

ग्रुप एकचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन विजय मिळवले असून त्यांच्याकडे प्रत्येकी सात-सात गुण आहेत. परंतु न्यूझीलंडेच नेट रन रेट इंग्लंडपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांनी इंग्लंडमला मागे टाकले आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जागा पक्की करण्यासाठी पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमने सामने असतील. हा सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) खेळला जाईल. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना गुरुवारी भारत आणि इंग्लंडमध्ये पार पडेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुश्ताक अली ट्रॉफीपाठोपाठ विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचा मुंबईचा मनसुबा! 17 सदस्यीय संघ जाहीर
एक दोन नव्हेतर दहा! आयसीसी पुरस्कारांमध्येही कोहलीच किंग; अशी आहे लांबलचक यादी 


Next Post
Photo Courtesy: Twitter/@ICC

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

IND-vs-NED

वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग

tim southee

टिम साउदीने ओळखली पाकिस्तानची ताकत, उपांत्य सामन्याआधी न्यूझीलंडला केले सावध

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143