Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने मोडला बाबर आझमचा विक्रम, बनला ‘असे’ करणारा पहिला कर्णधार

फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने मोडला बाबर आझमचा विक्रम, बनला 'असे' करणारा पहिला कर्णधार

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma

Photo Courtesy: BCCI.tv


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2022 मध्ये काही खास कामगिरी करू शकला नाहीये. फलंदाजाच्या रूपात त्याची बॅट अद्याप शांतच दिसत आहे. पण कर्णधाराच्या रूपात तो प्रत्येक सामन्यानंतर नवनवीन विक्रम नाववर करतो हे देखील तितकेच स्पष्ट आहे. रविवारी भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 71 धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला. या विजयानंतंर भारतीय संघ ग्रुप दोनमधून उपांत्य सामन्यासाठी पात्र झालाच, पण रोहितच्या नावापुढे एका मोठ्या विक्रमाची नोंद देखील झाली. 

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रोहितने कर्णधाराच्या रूपात इतिहास रचला आहे. कर्णधाराच्या रूपात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी 2022 मधील हा 21 वा (टी-20 क्रिकेट) विजय होता. रोहित आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचा विक्रम मोडीत काढला आहे. बाबरने एका वर्षात 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.

एवढेच नाही, झिम्बब्वेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर रोहितच्या नावावर अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हा विक्रम म्हणजे कर्णधाराच्या रूपात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याचा. रोहित आणि बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत बरोबरीवर आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आता टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या दोन्ही संघांपैकी कोणता संघ अंतिम सामन्यात जातो हे पाहण्यासारखे असेल. उपांत्य सामन्यात जर दोन्ही संघांनी विजय मिळवला, तर रविवारी (13 नोव्हेंबर) हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने सामने असतील.

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना कर्णधाराच्या रूपात रोहितचा 50 वा टी-20 सामना होता. यापूर्वी विराट कोहली देखील भारतासाठी 50 टी-20 सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार म्हणून खेळला आहे. भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम एमएस धोनी, याच्या नावावर आहे. धोनीने भारतासाठी 72 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे ‘सी’ आहात
पुन्हा रंगणार भारत विरूद्ध पाकिस्तान थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या फायनलची समीकरणे  


Next Post
Dhoni & Rohit & Babar & Imran

भारतासाठी 2011, पाकिस्तानसाठी 1992; यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणाच्या योगायोगाचे पारडे जड, घ्या जाणून

Shakib Al Hasan

शाकिब अल हसनचे मोठे विधान, उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतरही संघावर खुश

Photo Courtesy: Twitter

कतारचा फिफा वर्ल्डकप की मृत्यूची खाण! बुंदेसलिगाच्या सामन्यात झळकले "बॉयकॉट कतार 2022" चे बॅनर्स

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143