---Advertisement---

एक दोन नव्हेतर दहा! आयसीसी पुरस्कारांमध्येही कोहलीच किंग; अशी आहे लांबलचक यादी

On: सोमवार, नोव्हेंबर 7, 2022 9:12 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यावतीने दर महिन्याला प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player Of The Month) हा पुरस्कार दिला जातो. ऑक्टोबर महिन्यासाठी पुरुष व महिला गटातील विजेत्यांची घोषणा आयसीसीने सोमवारी (7 नोव्हेंबर) केली. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पुरुष गटात हा पुरस्कार आपल्या नावे करत, आणखी एका आयसीसी पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.

ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विराटला हा पुरस्कार देण्यात आला. विराटने या महिन्यात तीन शानदार टी20 अर्धशतके झळकावली होती. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली 82 धावांची खेळी ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे देखील म्हटले जात आहे. विराटने हा पुरस्कार मिळवताना दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर व झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना पछाडले.

 

या पुरस्कारासह विराटच्या नावावर आता दहा आयसीसी पुरस्कारांची नोंद झाली आहे. सर्वाधिक आयसीसी पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो पहिल्या स्थानी आहे. महत्त्वाचे म्हणजे प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार त्याने पहिल्यांदाच नामांकित झाल्यानंतर पटकावला. विराटने आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा 2012, 2017 व 2018 असा तीनदा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे.

आयसीसीतर्फे दिला जाणारा सर्वाधिक मानाचा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार त्याने 2017 व 2018 अशी सलग दोन वर्ष जिंकला आहे. तर सर्वोत्कृष्ट कसोटीपटूचा पुरस्कारही 2017 मध्ये त्याने आपल्या नावे केला होता. 2010 ते 2019 अशा दहा वर्षांसाठी दिल्या गेलेल्या दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू व दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू अशा दोन मानाच्या पुरस्कारांवर त्याने कब्जा केलेला. तर 2019 मध्ये आयसीसीतर्फे दिला जाणारा आयसीसी स्पिरिट ऑफ द गेम पुरस्कार त्याने जिंकला होता. विराटला आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ टी20 क्रिकेटसाठी आयसीसीचा कोणताही पुरस्कार मिळाला नाही. ( Virat Kohli Won His 10 th ICC Award)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

VIDEO: ‘बस झाले’, चाहत्यांना पाहून विराटने जोडले हात; कोहलीची क्यूट रिऍक्शन व्हायरल 

‘तो संघात असणे म्हणजे हत्ती पोसण्यासारखे’; दिग्गजाचे बवुमावर जहरी टीकास्त्र 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---