---Advertisement---

आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहचा टॉप १० मध्ये प्रवेश, तर कर्णधार कोहलीची मोठी घसरण

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 5:29 PM
Virat-Kohli-Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa vs India)  दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या (Johannesbur) मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात जसप्रीत बुमराह याने ५ गडी बाद केले होते. या कामगिरीचा फायदा त्याला आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत झाला आहे.

जसप्रीत बुमराहने (Jasprit bumrah) आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. त्याने सेंच्युरियन कसोटीत ५ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या जोरावर तो या यादीत ९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तसेच मोहम्मद शमी (Mohammad shami) देखील दोन स्थान वर येत १७ व्या स्थानी पोहोचला आहे. मोहम्मद शमीने सेंच्युरियनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात एकूण ८ गडी बाद केले होते. यामध्ये पहिल्या डावात त्याने ५ गडी बाद केले होते. तसेच भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R ashwin) दुसऱ्या स्थानी कायम आहे, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (pat Cummins)  पहिल्या स्थानी कायम आहे.

विराट कोहलीची फलंदाजी क्रमवारीत घसरण 
तसेच फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला (Virat Kohli)  मोठा फटका बसला आहे. तो दोन स्थानांनी घसरून ९ व्या स्थानावर आला आहे. कोहलीच्या खात्यात ७४७ रेटिंग गुण आहेत. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आठव्या स्थानावर आहे. (icc Bowlers and batsman rankings)

यापूर्वी विराट कोहली सातव्या स्थानावर होता. त्याचबरोबर रोहित शर्माच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तो पाचव्या स्थानावर कायम आहे. पाठदुखीमुळे विराट कोहली जोहान्सबर्ग कसोटीतून बाहेर झाला आहे. यापूर्वी त्याने सेंच्युरियन कसोटीत ३५ आणि १८ धावांची खेळी केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये.

फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन सर्वोच्च स्थानी आहे. त्याचे एकूण ९१५ रेटिंग गुण आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या :

Video: स्वस्तात बाद झाल्याने राहुलच्या संयमाचा तुटला बांध, द. आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत केली शाब्दिक बाचाबाची

कोरोनापुढे बीसीसीआयने टेकले गुडघे, रणजी ट्रॉफीसह ‘या’ २ देशांतर्गत स्पर्धा केल्या स्थगित

हे नक्की पाहा :

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज | 5 Memorable Last Overs

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---