---Advertisement---

विराट कर्णधार असलेला आयसीसी २०१८चा सर्वोत्कृष्ठ कसोटी संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंचा सहभाग

---Advertisement---

आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आज (22 जानेवारी) पुरूष सर्वोत्कृष्ठ कसोटी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 2018वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

या संघामध्ये भारतीय आणि न्यूझीलंड संघाचे प्रत्येकी तीन तर श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, विडींज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.

यामध्ये कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर न्यूझीलंड संघाचे केन विलियमसन, टॉम लॅथम आणि हेन्री निकोल्स या तिघांचाही या संघात समावेश आहे.

या संघाचे कर्णधारपद कोहलीला देण्यात आले आहे. तसेच कोहलीची आयसीसीच्या वनडे संघाच्या कर्णधारपदीही निवड करण्यात आली आहे. रिषभ पंतलाही आयसीसीने 2018 चा सर्वोत्तम उद्योन्मुख खेळाडू म्हणून पुरस्कृत केले आहे.

त्याचबरोबर श्रीलंकेचा दिमुथ करूणारत्ने, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, विंडीजचा जेसन होल्डर आणि पाकिस्तानचा मुहम्मद अब्बास यांचाही आयसीसीच्या कसोटी संघात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम

२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’

किंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment