जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25च्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिकेपाठोपाठ आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातही कसोटी मालिका खेळली जात आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने स्लो ओव्हर रेट म्हणजेच षटकांची गती कायम न राखण्याबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे की, आयसीसीने एक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता त्यांच्या खिशातून जास्त पैसे जाणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथे गुरुवारी (दि. 13 जुलै) आयसीसीची वार्षिक बैठक पार पडली. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या नियमांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत षटकांची गती कायम न राखण्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये घट करण्यात आली आहे.
नवीन आयसीसी स्लो ओव्हर रेट नियम
खरं तर, कसोटी क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर रेट (ICC Slow Over Rate Rule)च्या दंडामध्ये बदल करण्यात आला आहे. याची माहिती आयसीसीने दिली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे संघांच्या खात्यातून कापल्या जाणाऱ्या पाँईंट्समध्ये कोणताही बदल झाला नाहीये. मात्र, खेळाडूंच्या शुल्क कापण्याच्या नियमात बदल झाला आहे.
एका नियमानुसार, स्लो ओव्हर रेटमध्ये आता प्रत्येक खेळाडूच्या सामना शुल्कातून 10 टक्के नाही, तर 5 टक्के रुपये कापले जातील. नुकतेच भारतीय संघाच्या खेळाडूंचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23च्या अंतिम सामन्यात 100 टक्के सामना शुल्क कापले होते. मात्र, आता हे 50 टक्केच असेल.
आयसीसीचा ऐतिहास निर्णय, पुरुष-महिला संघांची बक्षीस रक्कम असेल समान
आयसीसीने वनडे विश्वचषक 2023पूर्वी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आयसीसीने जाहीर करत सांगितले आहे की, आता पुरुषांप्रमाणेच महिला संघांनाही समान बक्षीस रक्कम दिली जाईल. डर्बन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ असा की, आयसीसी स्पर्धांमध्ये आता पुरुष आणि महिला संघांनी कोणतीही स्पर्धा जिंकली, तर त्यांना समान बक्षीस रक्कम मिळेल. (icc announced modifications to over rate sanctions in test cricket know here)
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर जयसवालचे ड्रेसिंग रूममध्ये ग्रँड वेलकम; सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा गजर, तर रोहितने थोपटली पाठ
फाफच्या सुपर किंग्सचा अमेरिकन लीगमध्ये धमाका, नाईट रायडर्सविरुद्ध 69 धावांनी मिळवला दणदणीत विजय