सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादी चुकीची गोष्ट आपल्याकडून पोस्ट झाली, तर त्यामुळे पुढील गोष्टींचा सामना करावा लागतो. असेच काहीसे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीसोबत घडले आहे. आयसीसीने ट्विटरवर एक मोठी चूक झाली, जी त्यांनी नंतर दुरुस्तही केली. मात्र, केलेल्या चुकीसाठी नेटकरी आयसीसीला जबरदस्त ट्रोल करत आहेत. आयसीसीने अशी कोणती चूक केलीय, चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
आयसीसीने मंगळवारी (दि. 06 डिसेंबर) नोव्हेंबर महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ (Player of The Month Award) पुरस्कारासाठी पुरुष आणि महिला खेळाडूंना नामांकित केले आहे. पुरुष खेळाडूंमध्ये जोस बटलर (Jos Buttler), आदिल रशीद (Adil Rashid) आणि पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांचा समावेश होता. दुसरीकडे, महिलांमध्ये गेबी लुईस, नत्थाकन चँथम आणि अनुभवी सिदरा अमीन यांना नामांकित केले आहे. मात्र, आयसीसीने ट्विटरवर याची माहिती दिली, तेव्हा महिला प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित केलेल्या खेळाडूंच्या फोटोसोबत पुरुष क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. यानंतर सोशल मीडिया युजर्सनी आयसीसीची चांगलीच खिल्ली उडवली.
सोशल मीडियावर मजेशीर मीम्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. मात्र, आयसीसीला जेव्हा त्यांची चूक समजली, तेव्हा त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र, तोपर्यंत सोशल मीडिया युजर्सने तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावरील एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सस्ते नशे.”
Saste Nashe 😂😂 pic.twitter.com/AX5jtEjpH0
— बालकृष्ण चौबे 🇮🇳 (@Balkris15672044) December 6, 2022
दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “शाहीन छान दिसतोय, त्यामुळे मत त्यालाच जाते.”
https://twitter.com/Lost9921/status/1600123633925763072?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1600123633925763072%7Ctwgr%5E901b55a4d4d9a62791a2dfcfd40a9814329be45a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Ficc-trolls-after-annouced-player-of-the-month-nominee-on-twitter-1056242
आणखी एका युजरने लिहिले की, “आयसीसी माफ करा. माझ्याकडे तुमच्या ट्वीटचा पुरावा आहे.”
Sorry ICC, I have proof of the existence of this tweet 😂 pic.twitter.com/bliyTcQslP
— Kosha (@imkosha) December 6, 2022
एकाने अशीही कमेंट केली की, “तुमच्याकडे फक्त एकच काम आहे.”
You had one job#ICCRankings pic.twitter.com/zlRmScGluQ
— Akash Sinha (@AkashSinha_IND) December 6, 2022
पुरुष प्लेअर ऑफ द मंथ
जोस बटलर (इंग्लंड)
इंग्लंडचा फलंदाज आणि मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर याने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या संघाने आयसीसी पुरुषांच्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. बटलरने मागील महिन्याची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध सामनावीर पुरस्काराने केली. त्याने 47 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या संघाने 20 धावांनी सामना खिशात घातला. यानंतर त्याने भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने ऍलेक्स हेल्ससोबत 49 चेंडूत 80 धावा चोपत 169 धावांचे आव्हान पार केले. अंतिम सामन्यात बटलरने 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बटलरने मैदानावर नेतृत्वही केले, ज्यामुळे त्याच्या संघाने टी20 विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
आदिल रशीद (इंग्लंड)
आदिल रशीद याने सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारात स्वत:ला जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून वारंवार सिद्ध केले आहे. तसेच, नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडच्या ताफ्यात दमदार कामगिरी करत स्वत:चे स्थानही मजबूत केले. नोव्हेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या चार टी20 सामन्यात त्याने फक्त 4 विकेट्स घेऊनही, त्याचा 5.70चा इकॉनॉमी रेट उच्च दबावाच्या सामन्यांमध्येही विरोधी संघांची धावसंख्या रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण होता.
त्याने सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये श्रीलंकेविरुद्ध अंतिम साखळी सामन्यात 16 धावा देत 1 विकेट घेतली होती. तसेच, सामनावीर पुरस्कारही आपल्या नावावर कला होता. त्याने अंतिम सामन्यातही दर्जेदार गोलंदाजी केली होती.
शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान)
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना आफ्रिदी पुन्हा एकदा विरोधी संघांच्या फलंदाजांसाठी सातत्याने धोका ठरत आहे. त्याने 7.30च्या शानदार सरासरीने 10 विकेट्स घेत, त्याचे सर्वोत्तम आकडे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आले. त्या सामन्यात त्याने 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, नॉकआऊट फेरीत आपल्या संघाला मदत केली. मात्र, दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडला होता. मात्र, त्याने इंग्लंडवर दबाव बनवला होता. (icc announced player of the month nominee on twitter and gets trolled know why here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा व्हिसा भारताकडून मंजूर, ब्लाईंड टी20 विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच पडला दुसऱ्या कसोटीतून बाहेर, आता नेतृत्व कोण करणार?