यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. आयसीसी या महत्वाच्या स्पर्धेपूर्वी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सर्वच्या सर्व 16 सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. हे सर्व सामने मेलबर्न आणि ब्रिस्बेन याठिकाणी खेळले जातील. सराव सामन्यांची सुरुवात 10 ऑक्टोबर रोजी होईल.
सरवा सामन्यांच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीज विरुद्ध यूएई, स्कॉटलँड विरुद्ध नेदरलँड आणि श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील लढत पाहायला मिळेल. तसेच भारतीय संघाला त्यांचा पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळायचा आहे. यजमान ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात भारताशी भिडेल. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी भारत त्यांचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा सामना महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, विश्वचषकापूर्वी होणाऱ्या या सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जाणार नाही.
सराव सामन्यांची पहिली फेरी 10 ते 13 ऑक्टोबर रोजी खेळली जाईल. या फेरीतील सर्व सामने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि जंक्शन ओवल याठिकाणी विभागून खेळवले जातील. तसेच ज्या संघांनी आधीपासूनच सुपर 12 संघांमध्ये जागा पक्की केली आहे, त्यांना ब्रिस्बेनमध्ये 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान, हे सराव सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे आणि त्यांना फक्त एक सराव सामना खेळायचा आहे, जो भारताविरुद्ध होईल.
2022 आईसीसी टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक
10 ऑक्टोबर – वेस्ट इंडीज विरुद्ध यूएई, जंक्शन ओवल, सकाळी 11:00 वाजता
10 ऑक्टोबर – स्कॉटलँड विरुद्ध नीदरलँड, जंक्शन ओवल, दुपारी 3:00 वाजता
10 ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, एमसीजी, सायंकाळी 7:00 वाजता
11 ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध आयरलँड, एमसीजी, सायंकाळी 7:00 वाजता
12 ऑक्टोबर – वेस्टइंडीज विरुद्ध नीदरलँड, एमसीजी, सायंकाळी 7:00 वाजता
13 ऑक्टोबर – जिम्बाब्वे विरुद्ध नामिबिया, जंक्शन ओवल, सकाळी 11:00 वाजता
13 ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध आयरलँड, जंक्शन ओवल, दुपारी 3:00 वाजता
13 ऑक्टोबर – स्कॉटलँड विरुद्ध यूएई, एमसीजी, सायंकाळी 7:00 वाजता
17 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, गाबा, दुपारी 2:00 वाजता
17 ऑक्टोबर – न्यूजीलैंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका, एलन बॉर्डर फील्ड, दुपारी 2:00 बजे
17 ऑक्टोबर – इंग्लैंड विरुद्ध पाकिस्तान, गाबा, सायंकाळी 6:00 बजे
17 ऑक्टोबर – अफगानिस्तान विरुद्ध बांग्लादेश, एलन बॉर्डर फील्ड, सायंकाळी 6:00 बजे
19 ऑक्टोबर – अफगानिस्तान विरुद्ध पाकिस्तान, गाबा, दुपारी 1:00 बजे
19 ऑक्टोबर – बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रीका, एलन बॉर्डर फील्ड, सायंकाळी 6:00 बजे
19 ऑक्टोबर – न्यूजीलैंड विरुद्ध भारत, गाबा, सायंकाळी 6:00 बजे
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नसीम शाहमूळे शास्त्रींना आठवला 36 वर्षापूर्वीचा ‘तो’ सामना; बाबरला म्हणाले थँक्यू
गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या वॉशिंग्टनला आईने दिले फटके, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
आख्खं जग वाईट बोलत असताना मिर्झापूरमधल्या ‘बबलू भैया’ने केली कर्णधार रोहितची पाठराखण, शेअर केली खास पोस्ट