साउथम्पटन| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटीत अजिंक्यपद अंतिम सामना एजेस बाउल स्टेडियम येथे चालू आहे. परंतु या ऐतिहासिक सामन्यात खेळाडूंपेक्षा पावसाची जास्त फलंदाजी पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी (१८ जून) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे अपेक्षित षटकांपेक्षा कमी खेळ झाला.
पुन्हा पाऊस खलनायक बनल्याने चौथा दिवसाचा खेळही रद्द झाला. अशात हा सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांपैकी एक संघ विजेता घोषित होण्याची शक्यता फार कमी आहे. अशात या संघांना मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम नक्की किती असेल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अंतिम सामना अनिर्णित राहिल्यास मिळणार ‘इतकी’ रक्कम
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलार्डिस यांनी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. त्यानुसार पावसाचा व्यत्यत किंवा इतर कोणत्याही कारणास्तव सामना वेळेवर पूर्ण न झाल्यास एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवशीही जर सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने याआधीच स्पष्ट केले होते. असे झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी ८ कोटी ९० लाख बक्षीस रक्कम वितरित करण्यात येईल.
ICC CEO Geoff Allardice has announced that the winner of the World Test Championship will receive US $1.6 million as prize money; $800,000 for the runner-up 🏏
The prize money will be split between the teams in case of a draw 🏆 #WTC21 pic.twitter.com/wGG9PV1OsE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 14, 2021
याखेरीज जर सामना सुरळितपणे पार पडला. तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्याला १.६ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. भारतीय रुपयात याची किंमत जवळपास ११ कोटी ७० लाख रुपये इतकी आहे. त्याचवेळी उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर्सची (५ कोटी ९३ लाख) बक्षीस रक्कम प्रदान करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या:
एकही चेंडू न टाकता चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, आजही असेल का पावसाचं सावट? घ्या जाणून
WTC फायनल: पावसामुळे २ दिवस वाया गेल्यानंतर आयसीसीकडून दर्शकांना ‘मोठा दिलासा’
पावसामुळे कसोटी चॅम्पियनशीप फायनल ड्रॉ झाली तर कोण असेल विजेता? घ्या जाणून