आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने रविवारी (२१ नोव्हेंबर) पुष्टी केली की, आठ महिन्यांहून अधिक काळ हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले ज्योफ अल्लार्डाईस यांची संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अल्लार्डाईस हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहे आणि त्यांनी आठ वर्षांपासून आयसीसीचे महाव्यावस्थापक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये आठ वर्षे अशीच भूमिका बजावली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना आयसीसीचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले होते आणि त्यांनी गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ उत्कृष्ट काम केले आहे. त्या जोरावर त्यांना हे पद मिळाले आहे.
आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले म्हणाले, “मला हे ऐकून खूप आनंद झाला की ज्योफ अल्लार्डिस यांनी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची भूमिका स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२१ च्या यशस्वी आयोजनातून त्यांनी अत्यंत आव्हानात्मक काळात जबरदस्त नेतृत्व दाखवले आहे. ज्योफ यांना जागतिक क्रिकेट आणि त्यातील भागधारकांचे अतुलनीय ज्ञान आहे. त्यांनी सातत्याने दाखवून दिले आहे की, पुढील दशकासाठी खेळाला आकार देण्यासाठी आमच्या सदस्यांसह मिळून काम करण्यासाठी तेच योग्य व्यक्ती आहेत, कारण आम्ही काही नवीन योजना सुरू करत आहोत.”
आयसीसीचे स्थायी मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले जो अल्लार्डिस म्हणाले, “आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती होणे हा एक मोठा सन्मान आहे. तसेच विशेषाधिकार देखील आहे. मला खेळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी ग्रेग आणि आयसीसीचे बोर्डाचे आभार मानू इच्छितो. आम्ही विकासाच्या एका रोमांचक आणि नवीन टप्प्यात प्रवेश करत आहोत. आमचे लक्ष सतत आमच्या खेळासाठी योग्य गोष्टी करण्यासाठी आणि दीर्घकालीन यश आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी सदस्यांसोबत जवळून काम करण्यावर असेल. गेल्या आठ महिन्यांत आयसीसी कर्मचार्यांच्या वचनबद्धतेबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो आणि अशा प्रतिभावान सहकाऱ्यांसोबत क्रिकेटची सेवा सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान
जवळपास ठरलंच! स्मिथ नाहीतर ‘हा’ असणार ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार
शाहीनला भोवला अतातायिपणा; ‘या’ प्रकरणात आयसीसीने केली कारवाई