---Advertisement---

जवळपास ठरलंच! स्मिथ नाहीतर ‘हा’ असणार ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार

On: रविवार, नोव्हेंबर 21, 2021 7:22 PM
---Advertisement---

केवळ एका आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषक आपल्या नावे केला. त्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने तडकाफडकी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता त्याच्या जागेवर कोणाला कर्णधारपद द्यायचे हा प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे आहे. मात्र, आता या प्रकरणावर पडदा पडू शकतो. याबाबतची वृत्ते ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे देऊ लागली आहेत.

हा असू शकतो पुढील कर्णधार
चार वर्षांपूर्वी झालेली गंभीर घटना अचानकपणे उजेडात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कसोटी कर्णधार टीम पेन याने राजीनामा दिला होता. त्याच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रतिष्ठेची ऍशेस मालिका सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रयत्न करत आहे.

ऑस्ट्रेलिया माध्यमांतील वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वरिष्ठ वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार करण्याचे नक्की केले असून, माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ हा संघाचा उपकर्णधार असेल. निवडसमिती स्मिथ याला कर्णधार करण्यासाठी इच्छुक होती. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्स याला पाठिंबा दर्शवला आहे. कमिन्स याने यापूर्वीच आपण कर्णधारपदासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते.

पेनची जागा अबाधित राहणार का?
राजीनामा दिल्यानंतर माजी कर्णधार टीम पेन हा ऍशेस मालिकेसाठी संघात निवडला जाणार का? याबाबत अजूनही स्पष्ट झाले नाही. त्याने न खेळण्याचा निर्णय घेतल्यास मॅथ्यू वेड याची संघात निवड होऊ शकते. ऍशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

पहिल्या दोन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ-
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्युशेन, उस्मान ख्वाजा, टीम पेन, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिचेल स्वेपसन, नॅथन लियॉन, झाय रिचर्डसन, मायकेल नेसर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---