बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. तेव्हापासून या स्पर्धेबाबत पेच निर्माण झाला होता. बीसीसीआयला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवायची आहे. ज्यामध्ये भारताचे सामने तिसऱ्या देशात आयोजित केले जातात. आतापर्यंत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याला स्पष्ट नकार दिला आहे. आता या समस्येचे निराकरण करण्यासाठी आयसीसीने 29 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन बैठक घेणार आहे. ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेला अंतिम रूप देण्यासाठी चर्चा होणार आहे. कारण त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यास आधीच बराच विलंब झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी आयसीसी बोर्डाची 29 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. असे आयसीसीच्या प्रवक्त्याने मंगळवारी मीडियाला बोलताना सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 1 डिसेंबर रोजी आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या दोन दिवस आधी ही महत्त्वाची ऑनलाइन बैठक होत आहे. नवीन अधिकारी पदभार स्वीकारण्यापूर्वी ते आणि इतर मंडळ सदस्य हे प्रकरण सोडवण्यास उत्सुक असतील.
The ICC to take final call on the Champions Trophy after the meeting on 29th November. (Espncricinfo). pic.twitter.com/L1aDQ4QQtA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2024
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाची यादी आयसीसीकडे पाठवला होता. ज्यामध्ये लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे सामने होणार होते. भारताचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आयोजले आहे. या स्टेडियमच्या नूतनीकरणावर पीसीबीने खूप पैसा खर्च केला आहे. या कारणास्तव पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भूमीवर आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल स्वीकारल्यास भारताचे सामने यूएई किंवा दक्षिण आफ्रिकेत होऊ शकतात.
यापूर्वी आशिया कप 2023चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. त्यानंतर भारताने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. काही सामने पाकिस्तानातही झाले. आता भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फक्त हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते नाकारत आहे.
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. उभय संघांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला. तेव्हापासून दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.
हेही वाचा-
NZ VS ENG; या दोन महान खेळाडूंच्या नावावर कसोटी मालिका, ट्रॉफीमध्ये बॅटचाही वापर
CSK full squad; या खेळाडूच्या परतण्याने चेन्नईचा संघ आणखी बलशाली! यंदा ट्राॅफी उंचवणार?
RCB Full Squad; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा संघ अधिकच शक्तिशाली! कर्णधारपद मात्र कोड्यात