भारतीय संघाने आतापर्यंत 4 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यात भारतीय माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 3 ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आज कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. क्रिकेट मैदानावर धोनीने आतापर्यंत अनेकदा असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे भारतीय संघाला हरलेल्या सामन्यातही विजय मिळाला आहे. आयसीसी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धोनीच्या चातुर्याचे असेच एक अप्रतिम उदाहरण पाहायला मिळाले होते. भारतीय संघाने चॅम्पियनस्ट ट्रॉफी जिंकून शुक्रवारी (23 जून) 10 वर्ष पूर्ण होत आहेत.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला 5 धावांनी हरवून विजेतेपद जिंकले होते. पावसामुळे अंतिम सामना 50 षटकांऐवजी 20-20 षटकांचा खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ १२९ धावा केल्या होत्या. विजयासाठी १३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ धोनीच्या हल्ल्यापासून सावरला नाही आणि ते केवळ 124 धावा करू शकले.
हा सामना जिंकल्यानंतर, सादरीकरण कार्यक्रमात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने धोनीशी संवाद साधताना विचारले होते की, “जेव्हा विरोधी संघाला विजयासाठी फक्त 129 धावा करायच्या होत्या. तेव्हा तू तुझ्या संघातील खेळाडूंना काय सांगितले होते?”
या प्रश्नाचे उत्तर देताना धोनी म्हणाला, “मी सर्वप्रथम त्यांना सांगितले की, आकाशात पाहू नका. देव आपल्याला वाचवण्यासाठी येणार नाही. जे काही आहे ते आपल्यालाच करावे लागणार आहे.” धोनीच्या या शब्दांनी खरोखरच भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित केले असावे. याचमुळे भारताने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते.
https://www.instagram.com/p/CQcvjFNpXyu/?utm_source=ig_web_button_share_sheet
त्याआधी माजी कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 चा टी-२० विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे. त्याने चेन्नई संघाला आतापर्यंत 4 आयपीएल विजेतेपद जिंकून दिली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
होप-पूरनने दाखवली कॅरेबियन पॉवर! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये नोंदवला सलग दुसरा विजय
MPL 2023: पुणेरी बाप्पाची सलग दुसरी हार! विजयासह सोलापूर रॉयल्सचे आव्हान कायम