चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. 19 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती आहे. परंतु अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये ही स्पर्धा वनडे ऐवजी टी20 फॉरमॅट मध्ये असू शकते. असे सांगण्यात आले आहे.
आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्पर्धेचे वेळापत्रक 100 दिवस अगोदर जाहीर व्हायला हवे होते. जर चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार असेल तर त्याचे वेळापत्रक 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत जाहीर व्हायला हवे होते. भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर वेळापत्रकाला विलंब होत आहे. खरे तर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलबाबतही चर्चा सुरू आहे. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच स्पर्धेचे सामने कुठे होणार हे कळण्याची शक्यता आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद कालपर्यंत म्हणजे 11 डिसेंबरपर्यंत सोडवला जाऊ शकला नाही. जसे आधीच भाकीत केले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पासून फक्त 75 दिवसांवर आहे. आणि संबंधितांना भीती आहे की लवकरच कोणताही तोडगा निघणार नाही. त्यामुळे मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. दीर्घकाळ एकदिवसीय स्वरूपात होणारी ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये बदलली जाण्याची शक्यता आहे.
तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे काही नवीन नाही. याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील आवृत्तीपासून टी20 फॉरमॅटमध्ये होणार असल्याचे वृत्त होते. परंतु बीसीसीआय-पीसीबी वादामुळे ती या वर्षीच होऊ शकते. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता ही स्पर्धा कोणत्या फॉरमॅटमध्ये होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
स्मृती मानधानाचा विश्वविक्रम, अशी कामगिरी करणारी जगातील पहिली क्रिकेटर!
SMAT: बंगाल, उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्राचे स्वप्न भंगले, उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले
VIDEO; मैदानातच दोन भारतीय खेळाडूंमध्ये झाली बाचाबाची! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल