क्रिकेटप्रेमींसाठी दक्षिण आफ्रिकेमधून एक वाईट बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. कोरोना या साथीच्या आजारामुळे तुर्तास हा दौरा गुंडाळण्यात आला आहे. उभय संघांदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार होती.
आयसीसीने दिली माहिती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करताना म्हटले आहे की, ‘दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही बोर्डांच्या संमतीने खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत, उभय संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.’
🚨 JUST IN: The #SAvENG ODI series has been postponed.
The decision was taken jointly by the two boards to ensure the mental and physical health and welfare of players from both teams.
A decision will be made between the boards as to when the series will now take place. pic.twitter.com/tiGKEkNL0b
— ICC (@ICC) December 7, 2020
इंग्लंड संघ आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
कोरोना महामारीनंतर इंग्लंड संघ प्रथमच कोणत्या तरी देशाच्या दौऱ्यावर गेला आहे. इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० अशा फरकाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पाडाव केला होता. त्यानंतर ४ डिसेंबरपासून दोन्ही संघांदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाचा एक खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने, ही मालिका ६ डिसेंबरपर्यंत स्थगित केली होती.
खेळाडूनंतर हॉटेल कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह
दक्षिण आफ्रिकेच्या कोरोनाबाधित खेळाडूचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, ६ डिसेंबरपासून ही मालिका पुन्हा सुरू होणार होती. परंतु त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांपैकी काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता मालिका व संपूर्ण दौरा रद्द करण्याची नामुष्की दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर ओढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून विराट सलग सोडतोय झेल; माजी भारतीय फलंदाजाने सांगितले कारण
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग