आयसीसीनं नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठी माहिती शेअर केली आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसारच होणार असल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलं. टीम इंडिया स्पर्धेतील आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळेल. मात्र, आयसीसीनं अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. बीसीसीआयनं या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीनं स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यास मान्यता दिली.
आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित माहिती आपल्या वेबसाइटवर शेअर केली आहे. आयसीसीनं सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व सामने 2024 ते 2027 या कालावधीत हायब्रिड मॉडेल अंतर्गतच आयोजित केले जातील. हे दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळतील. हा नियम आयसीसीच्या आगामी स्पर्धांनाही लागू होईल. आता आयसीसी लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक शेअर करणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळली जाईल.
आयसीसीनं म्हटलं आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीसह इतरही स्पर्धा आहेत ज्या हायब्रिड मॉडेल अंतर्गत आयोजित केल्या जातील. आगामी महिला विश्वचषक 2025 देखील याच मॉडेलनुसार होणार आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित होणार आहे. याचाच अर्थ या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळायला येणार नाही. याशिवाय पुरुष टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धाही आता हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जाईल.
आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही एक आनंदाची बातमी दिली आहे. बोर्डानं महिला टी20 विश्वचषक 2028 पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही स्पर्धाही हायब्रीड मॉडेलनुसारच होईल. पाकिस्तानला होस्टिंगचे अधिकार देण्यात आले असले तरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळणार नाही.
हेही वाचा –
विराट कोहली लवकरच भारत सोडू शकतो, पत्नी अनुष्कासोबत इथे शिफ्ट होणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!
मेलबर्न विमानतळावर राडा! विराट कोहलीला राग अनावर; नेमकं काय घडलं?