युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच यूएसए क्रिकेट संघाने यूएईविरुद्धचा एकदिवसीय सामना ४ विकेट्सने जिंकला. आयसीसी विश्वचषक लीग २च्या १२व्या फेरीतील हा चौथा सामना होता. प्रथम फलंदाजी करताना यूएईने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात सूएसएने हे लक्ष्य ४४.५ षटकांमध्ये आणि ६ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. सुशांत मोदानीला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शानासाठी सामनावीर निवडले गेले.
यूएई (UAE Cricket Team) संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूएसए (USA Cricket Team) संघाच्या गोलंदाजांनी यूएईचा हा निर्णय सपशेल चुकीचा ठरवला. यूएईने संघाची धावसंख्या शून्य असताना पहिली विकेट गमावली. सलामीवीर फलंदाज मुहम्मद वसीम स्वतःचे खातेही खोलू शकला नाही. त्यानंतर अरविंदच्या रूपात संघाने २६ धवांवर दुसरी विकेट गमावली.
मागच्या सामन्यात संघासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केलेला चिराग सुरीने या सामन्यात २३ धावा केल्या. यूएईसाठी सर्वात जात धावांचे योगदान रिजवानने दिले. त्याने ६७ धावांची खेळी केली. राहुल भाटिया आणि काशिफ दौड २४-२४ धावा करून नाबाद राहिले. नियमित अंतरावर विकेट गमावल्यामुळे संघाला २०३ धावांवर समाधान मानावे लागले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर यूएसएला २७ धावासंख्या असताना पहिला झटका लागला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी भारतात जन्मलेल्या सुशांत मोदानी आणि यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल यांनी १०२ धावांची भागीदारी पार पाडली. सुशांत मोदानीने १०२ चेंडूत ७० धावा केल्या आणि मोनांक पटेलने देखील ४९ धावांची महत्वाची खेळी केली. मध्यक्रमात अष्टपैलू गजानंद सिंगने देखील नाबाद २९ धावा केल्या आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. यूएईसाठी त्यांचा कर्णधार अहमद रजाने ४६ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. पण तरीदेखील त्यांना या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मध्ये ‘हे’ ३ बदल करत सीएसके करणार दमदार पुनरागमन, दुसरा बदल खूपच महत्त्वाचा
‘या’ ५ गोष्टी घडल्यामुळे पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022ची ट्रॉफी
गुजरातला विनर बनवल्यानंतर दिग्गजाने धोनीशी केली पंड्याची तुलना, म्हणाले, ‘तोही असेच करायचा’