सध्या आयसीसी विश्वचषक क्वालिफायर 2023 सामने खेळले जात आहेत. यादरम्यान एकापेक्षा एक रोमाचंक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील 7वा सामना आयर्लंड विरुद्ध स्कॉटलँड संघात खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलँडने अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दणदणीत विजय मिळवला. यासह स्कॉटलँडने पहिलाच सामना खिशात घालत स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
या सामन्यात स्कॉटलँड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 286 धावा केल्या होत्या. हे आव्हान स्कॉटलँडने 9 विकेट्स गमावत 289 धावा करून पार केले. तसेच, 1 विकेटने विजय साकारला.
या सामन्यात स्कॉटलँडच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. सलामीवीर ख्रिस्तोफर मॅकब्राईड याने 56 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्यानंतर मधल्या षटकातील फलंदाजाने 18 धावांहून अधिक योगदान दिले नाही. एकेवेळी स्कॉटलँडची धावसंख्या 7 बाद 152 अशी होती. मात्र, इथून मायकल लीस्क (Michael Leask) याने मार्क वॅट याच्यासोबत 82 धावांची भागीदारी रचली. यामध्ये वॅटने 47 धावांचे योगदान दिले. मात्र, यानंतर लीस्कने डाव सांभाळला. त्याने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. लीस्क याने 61 चेंडूत सर्वाधिक नाबाद 91 धावांची खेळी साकारली. यामध्ये 4 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.
यावेळी आयर्लंडकडून गोलंदाजी करताना मार्क एडेर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जोशुआ लिटल आणि जॉर्ज डॉकरेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, कर्टिस कॅम्फर आणि बेंजामिन व्हाईट यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
कर्टिस कॅम्फरची वादळी खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांचे 5 विकेट्स या फक्त 70 धावांवर पडल्या होत्या. मात्र, कर्टिस कॅम्फर (Curtis Campher) याचे शानदार शतक आणि जॉर्ज डॉकरेल याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर आयर्लंडने मजबूत धावसंख्या उभारली. कॅम्फरने यावेळी 108 चेंडूत 120 धावा चोपल्या. यामध्ये 4 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. तसेच, डॉकरेल 93 चेंडूत 63 धावा करण्यात यशस्वी झाला. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 286 धावा केल्या होत्या.
यावेळी स्कॉटलँडकडून ब्रेंडन मॅकमुलेन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 7 षटके गोलंदाजी करताना 37 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. यात 1 निर्धाव षटकाचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ख्रिस सोल, मार्क वॅट आणि ख्रिस्तोफर मॅकब्राईड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (icc cricket world cup qualifier 2023 ireland vs scotland 7th match report group b know result)
महत्वाच्या बातम्या-
अजूनही वेळ गेली नाही! ‘या’ 3 गोष्टींवर रोहितला द्यावे लागेल लक्ष, नाहीतर कर्णधारपदावरून होईल हाकालपट्टी
MPL 2023 । ईगल नाशिक टायटन्सचा पहिला पराभव, रत्नागिरी जेट्सची प्लेऑफमध्ये थाटात एन्ट्री