नुकतेच आयसीसीने जागतिक कसोटी फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. बॉक्सिंग डे कसोटीचे तीन सामने झाल्यानंतर या क्रमवारीत काही बदल झाले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या शतकी खेळीचा फायदा झाला असून त्याने अव्वल स्थान गाठले आहे. तसेच भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेनेही या क्रमवारीत आगेकूच केली आहे.
आयसीसीने गुरुवारी ताजी क्रमवारी जाहीर केली. यात मेलबर्नमधील भारत-ऑस्ट्रेलियाचा कसोटी सामना, दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांच्यातील सेंच्युरीयन येथील सामना आणि न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना, यांचा समावेश आहे. केन विलियम्सनने या क्रमवारीत १३ गुण कमावत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्याने विराट कोहली आणि स्टीव स्मिथला मागे टाकले. विराट कोहली आता या क्रमवारीत ८७९ गुणांसह दुसऱ्या स्थानांसह आहे, तर स्टीव स्मिथची घसरण झाली असून तो ८७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
या क्रमवारीत भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेला मेलबर्न कसोटीतील शतकाचा फायदा झाला. रहाणेने पाच स्थानांची आगेकूच करत तो आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशाने आणि पाकिस्तानचा बाबर आझम अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कायम आहेत. भारताच्या चेतेश्वर पुजाराची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता दहाव्या क्रमांकावर आहे.
We have a new No.1, folks!
⬆️ Kane Williamson rises to the top
⬆️ Ajinkya Rahane jumps to No.6Latest update in the @MRFWorldwide ICC Test Rankings ???? https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/rhmfe8jpUd
— ICC (@ICC) December 31, 2020
बॉक्सिंग डे कसोटीचा भारताला फायदा
मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याचा भारतीय संघाला फायदा झाला. अजिंक्य रहाणेने शतक झळकाविल्याने त्याने सहा स्थानांनी प्रगती केली. गोलंदाजानाही दमदार प्रदर्शनाचा लाभ झाला आहे. आर अश्विनने दोन स्थानांनी प्रगती करत सातवे स्थान गाठले असून जसप्रीत बुमराह एका स्थानाने आगेकूच करत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला मोठा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर
दहावी विकेट काढण्यासाठी विलियम्सनने ‘अशी’ लढवली शक्कल, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल प्रशंसा
जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप, ‘या’ संघाला टाकले मागे






