आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी सर्वच फलंदाजांना गमतीने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान दिले होते. याचा फोटो आयसीसीने ट्विटरवर शेअर केला होता.
झाले असे की अमेरिकन रॅपर कॅनी वेस्टने 13 आॅगस्टला ‘कोणीही कोणापेक्षा महान नाही’ असा ट्विट केला होता. त्यामुळे आयसीसीने मजेने सर्व फलंदाजांना अव्वल स्थान विभागुन दिले. त्याचबरोबर आयसीसीने वेस्टच्या ट्विटचाही फोटो शेअर केला आहे.
https://twitter.com/ICC/status/1029348958043287554
खेळाडूंच्या क्रमवारीच्या फोटोत सर्व फलंदाजांच्या नावाआधी ‘=1’ असे लिहिले आहे. तर या ट्विटला कॅप्शन देताना “तू जर असं म्हणत असशील तर” असे दिले आहे.
विषेश म्हणजे 13 आॅगस्टलाच आयसीसीने इंग्लंड विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या कसोटीनंतर कसोटी क्रमवारी जाहिर केली होती. यात अनेक भारतीय खेळाडूंची क्रमवारी घसरली होती. भारताचा कर्णधर विराट कोहलीही 10 दिवसाच्या आतच अव्वल क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी घसरला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–बेन स्टोक्सच्या निर्दोष मुक्ततेनंतर दोन तासातच इंग्लंडच्या संघात समावेश
–अखेर प्रकरण मिटले, बेन स्टोक्सची निर्दोष मुक्तता
–सचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा?





