क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ठ्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC 2025) फायनल सामन्याची तारीख जाहीर केली आहे. इंग्लंडचे ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर 11-15 जून रोजी फायनल सामना खेळवला जाणार आहे., तर गरज भासल्यास 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे.
आयसीसीच्या सीईओने (CEO) या संदर्भात एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) फायनल ही क्रिकेट जगातील सर्वात कमी कालावधीतील सर्वात रोमांचक स्पर्धा बनली आहे. त्यामुळे, तारीख जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 2025ची फायनल ही जगातील कसोटी क्रिकेटच्या वाढत्या आकर्षणाची ओळख आहे ज्यामुळे चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे, म्हणून मी त्यांना विनंती करतो की पुढच्या वर्षीच्या सामन्याची तिकिटे बुक करा.”
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज (टी20+वनडे+कसोटी)
‘विश्वचषकात हॅटट्रिक आणि सर्वाधिक विकेट्स’, वाढदिवसादिनी जाणून घ्या शमीचे खास रेकाॅर्ड्स
Champions Trophy; पाकिस्तानात जाण्याबाबत BCCI ची भूमिका समोर, पाहा मोठे अपडेट