---Advertisement---

द्रविडप्रमाणेच अनिल कुंबळेलाही त्याच्या मुलाला बनवायचं होतं क्रिकेटर, सांगितली मनातली गोष्ट

On: सोमवार, सप्टेंबर 2, 2024 9:36 PM
anil kumble son
---Advertisement---

भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू व माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुलगा समित द्रविडची (Samit Dravid) भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली. भारतीय अंडर 19 संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि 4 दिवसीय सामने खेळणार आहे.

समित उजव्या हातानं फलंदाजी करतो. याशिवाय तो उजव्या हातानं मध्यमगती गोलंदाजी देखील करतो. तो कर्नाटकच्या अंडर 19 संघाचा सदस्य राहिला आहे, ज्यानं 2023-24 हंगामात कूच बिहार ट्रॉफी जिंकली होती. याशिवाय समितनं लंकाशायर संघाविरुद्ध तीन दिवसीय सामन्यात कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. सध्या तो महाराजा ट्रॉफी टी20 स्पर्धेत म्हैसूर वॉरिअर्स संघाकडून खेळतो आहे.

त्याचवेळी भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणारे गोलंदाज असलेल्या अनिल कुंबळे यांचा मुलगा मात्र वेगळ्या क्षेत्रात नाव कमावताना दिसतोय. अनिल कुंबळे यांचा मुलगा मायस हा वाइल्डलाइफ फोटोग्राफर आहे. अनिल कुंबळे यांना देखील फोटोग्राफीचा छंद असून, त्यांचा मुलगा त्यांचा दुसरा छंद जोपासतोय.

अनिल कुंबळे हे मायस याला क्रिकेटपटू बनू इच्छित होते. मात्र, मायस याने फोटोग्राफर बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी त्याला पाठिंबा दिला. मायस याला लहानपणापासून फोटोग्राफीचा छंद होता. तो छंद पुढे त्याची आवड बनला. मायस हा केवळ फोटोग्राफर नसून लेखक देखील आहे. त्याने ‘सफारी सागा: वाईल्ड एन्काऊंटर्स ऑफ यंग फोटोग्राफर’ हे पुस्तक देखील लिहिले आहे. 2022 मध्ये त्याचे हे पुस्तक प्रकाशित झाले होते. मायस हा क्रिकेट पाहतो. मात्र, त्याला त्याबद्दल फारशी माहिती नसल्याचे अनिल कुंबळे यांनी सांगितले होते.

क्रिकेटपटूंची मुले अशी वेगळ्या क्षेत्रात येत असली तरी, काही क्रिकेटपटूंची मुले क्रिकेटच खेळताना दिसतात. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन हा आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्यासोबतच वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा राजवीर हा देखील क्रिकेटपटू आहे.

हेही वाचा-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 वेगवान गोलंदाज, एकही भारतीय नाही
या बाबतीत जो रूट विराटपासून खूपच दूर; पाहा किंग कोहलीचा हा विश्वविक्रम!
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ 4 खेळाडूंनी फेकले सर्वाधिक NO-BALL

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---