---Advertisement---

आयसीसीकडून ‘कनकशन सब्स्टिट्यूट’ आणि ‘वाईड बॉल’ नियमात मोठे बदल! वाचा सविस्तर

On: शनिवार, जून 28, 2025 10:30 PM
---Advertisement---

ICC has changed the rules of cricket: क्रिकेटचा खेळ योग्य पद्धतीने चालावा यासाठी आयसीसी (ICC) वेळोवेळी नियमांमध्ये बदल करत असते. याच अनुषंगाने आयसीसीने कनकशन सब्स्टिट्यूट (खेळाडूला दुखापत झाल्यास) (Concussion Substitute) आणि वाईड बॉल (Wide Ball) च्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

नवीन कनकशन सब्स्टिट्यूट नियमानुसार, सर्व संघांना कनकशनमुळे बदली होणाऱ्या खेळाडूंची यादी अगोदरच सांगावी लागणार आहे. यात एक बदल असाही आहे की, जर कोणताही खेळाडू या नियमांतर्गत मैदानातून बाहेर गेला, तर त्याला कमीतकमी 7 दिवस खेळापासून दूर राहावे लागेल. याला ‘स्टँड डाउन’ असे नाव देण्यात आले आहे. या नियमाची 6 महिने चाचणी घेतली जाईल. (7-day stand down rule)

यासोबतच, वाईड बॉलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. याचा उद्देश गोलंदाजांना थोडी मदत करणे हा मानला जात आहे. वाईड बॉल देण्यासाठी आता फलंदाजांच्या पायांचा संदर्भ (Batsman’s Leg Reference) देखील घेतला जाईल आणि त्यानुसार चेंडू वाईड आहे की नाही याचा निर्णय घेतला जाईल. (Cricket law amendments)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---