---Advertisement---

आयसीसीने निवडला 2023 वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघ, सूर्यकुमार यादवकडे दिली संघाची धुरा

On: सोमवार, जानेवारी 22, 2024 4:54 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

आयसीसीने 2023 सालचा सर्वोत्कृष्ट टी-20 संघ जाहीर केला आहे. आयसीसीने भारताच्या सूर्यकुमार यादव याला या संघाचा कर्णधार बनवले आहे. सूर्याशिवाय भारताच्या यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग हे देखील या संघात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा या संघात समावेश नाही.

आयसीसीच्या या संघात भारताचे चार, झिम्बाब्वेचे दोन, इंग्लंडचा एक, वेस्ट इंडिजचा एक, आयर्लंडचा एक आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीने 2023 च्या सर्वोत्कृष्ट टी-20 संघात युगांडाच्या एका खेळाडूची देखील निवड केली आहे. त्याचवेळी आयसीसीने आपल्या सर्वोत्तम टी-20 संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची निवड केलेली नाही.

आयसीसीने भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, लेगस्पिनर रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची 2023 च्या सर्वोत्तम टी20 मध्ये निवड केली आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा आणि वेगवान गोलंदाज रिचर्ड नगारवा देखील या संघाचा भाग आहेत. न्यूझीलंडचा मार्क चॅपमन आणि आयर्लंडचा अष्टपैलू मार्क आदीर यांचीही आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघात निवड केली आहे. याशिवाय, आयपीएल 2024 मध्ये विक्री न झालेला इंग्लंडचा फिल सॉल्ट देखील या संघाचा एक भाग आहे.

दरवर्षी आयसीसी तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघ निवडते. जगभरातील 11 खेळाडूंना या संघांमध्ये स्थान मिळते. संघाव्यतिरिक्त आयसीसी प्रत्येक फॉरमॅटमधील एक सर्वोत्तम खेळाडू देखील निवडते. (ICC has selected the best T20 team of the year 2023 Suryakumar has been given the lead of the team)

आयसीसीने निवडलेला 2023 वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघ-
यशस्वी जयसवाल, फिल साॅल्ट, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रमजानी, मार्क आदिर, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा, अर्शदीप सिंग

हेही वाचा

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का, अनुभवी खेळाडू खास कारणास्तव बाहेर
IPL 2024: आयपीएलचा 17वा सीझन 22 मार्चपासून होणार सुरू, तर 26 मे रोजी होईल फायनल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---