आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये सुमार प्रदर्शन करणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. काही दिवसांपूर्वीच श्रीलंका सरकारने श्रीलंका क्रिकेट बोर्डाची बॉडी बरखास्त केली होती. याचसोबत बोर्डासाठी एक अंतरिम समितीही नियुक्त केली गेली. पण अशातच शुक्रवारी (10 नोव्हेंबर) आयसीसीकडून श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द केले आहे. मागच्या काही दिवसांपासून श्रीलंका क्रिकेट बोर्डा झालेल्या घडामोडी यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. सरकारने हस्तक्षेप करून श्रीलंका क्रिकेट बोर्डात केलेला फेरबदल सर्वांच्या नजरेत आला असून याामुळेच बोर्डाला आयसीसीचे सदस्यत्व गमवावे लागले आहे. या कारवाईमुळे आता भविष्यात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये श्रीलंका क्रिकेट संघ सहभागी होऊ शकणार नाहीये. आयसीसीकडून पुन्हा सदस्यत्व मिळवल्यानंतर श्रीलंकन संघ आयसीसी स्पर्धेत भाग घेऊ शकेल.
दरम्यान, श्रीलंकन संघाला आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. ग्रुप स्टेजमध्ये खेळलेल्या 9 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळाला. परिणामी श्रीलंकेला उपांत्य फेरीत स्थान मिळाले बनवता आले नाही. (ICC has suspended the membership of the Sri Lankan cricket board.)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
सिकंदर शेख बनला नवा महाराष्ट्र केसरी! अवघ्या साडेपाच सेकंदात शिवराज राक्षेवर मात
विश्वचषक 2023 चालू असतानाच श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, ‘या’ कारणामुळे उचलले मोठे पाऊल