---Advertisement---

Video: हा २ वर्षांचा चिमुकला ठरला आयसीसीचा ‘फॅन आॅफ द विक’

On: रविवार, जुलै 29, 2018 5:00 PM
---Advertisement---

आशिया खंडात क्रिकेट हा खेळ बराच लोकप्रिय आहे. त्यामुळे येथून अनेक प्रतिभाशाली खेळाडू समोर येत आहेत. नुकतेच आयसीसीने एका दोन वर्षाच्या मुलाचे क्रिकेट कौशल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

हा मुलगा बांगलादेशचा असून अली असे त्याचे नाव आहे. आयसीसीने त्याचे फलंदाजी कौशल्य पाहुन त्याला ‘फॅन आॅफ द विक’ (आठवड्यातील सर्वोत्तम चाहता) घोषित केले आहे.

तसेच आयसीसीने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘तू आयसीसीचा ‘फॅन आॅफ द विक’ आहेस. तू एक दिवस बांगलादेशकडून नक्की खेळशील.’

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हा लहान मुलगा त्याच्या घरातच फलंदाजीचा सराव करत असून वडीलांनी दिलेल्या सुचनेनुसार फलंदाजी करत आहे. त्याचे आॅफ साइडला फटकेबाजीचे कौशल्य अफलातून आहे. तसेच तो कव्हर ड्राइव्हचा शॉटही चांगला खेळत आहे.

या व्हिडिओनंतर आयसीसीने आणखी एक त्याचा रिमिक्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात क्रिकेट स्टेडियममधील समालोचनासह फुटेज वापरण्यात आले आहेत.

या मुलाचे क्रिकेट चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

सौरभ वर्माला रशियन ओपनचे विजेतेपद

कुलदीप नकोच, अश्विनच बेस्ट; ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत

नाणेफेक झाली चक्क क्रेडिट कार्डने!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment