आयसीसीची सुधारित वनडे क्रमवारी आज जाहीर झाली. या क्रमवारीत नुकत्याच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केलेल्या बांगलादेशी खेळाडूंना भरघोस फायदा झाला आहे. बांग्लादेशच्या मुशफिकुर रहीमने कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल पंधरा स्थानांमध्ये झेप घेतली आहे. तर फिरकी गोलंदाज मेहदी हसन दुसर्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंपैकी फलंदाजांनी आपले स्थान कायम राखले आहे. तर गोलंदाजांची मात्र काहीशी घसरण झाली आहे.
आयसीसी फलंदाजी क्रमवारी –
आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल दहा क्रमांकांमध्ये काहीही बदल झाला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८६५ गुणांसह यात अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली ८५७ गुणांसह दुसर्या स्थानी आहे. रोहित शर्माने देखील ८२५ गुणांसह तिसरे स्थान कायम राखले आहे. बांग्लादेशी फलंदाज मुशफिकुर रहीमला या क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याने या क्रमवारीत अव्वल पंधरा स्थानांमध्ये झेप घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असे चौदावे स्थान गाठले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात अर्धशतक आणि दुसर्या सामन्यात शतक झळकवल्याचा त्याला फायदा झाला आहे.
Mushfiqur Rahim has broken into the top 15 of @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings for batting after his stunning performance in the first two #BANvSL ODIs 🔥
Full rankings: https://t.co/tHR5rKl2SH pic.twitter.com/6li8uzIzZa
— ICC (@ICC) May 26, 2021
आयसीसी गोलंदाजी क्रमवारी –
आयसीसीच्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत काहीसे बदल झाले आहेत. बांग्लादेशच्या मेहदी हसनने श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी केल्याने त्याची या क्रमवारीत प्रगती झाली आहे. तो आता ७२५ गुणांसह दुसर्या स्थानी पोहोचला आहे. ७३७ गुणांसह न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानी आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो आता ६९० गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर बांग्लादेशच्याच मुस्तफिझुर रेहमानने देखील अव्वल दहामध्ये धडक मारली आहे. ६५२ गुणांसह तो आता नवव्या स्थानी आहे.
⬆️ Mehidy Hasan Miraz climbs to No.2
⬆️ Mustafizur Rahman breaks into top 10Huge gains for Bangladesh bowlers in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings 👏 pic.twitter.com/nr1PGH0ukT
— ICC (@ICC) May 26, 2021
आयसीसी अष्टपैलू क्रमवारी –
आयसीसीच्या या ताज्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील अव्वल दहा स्थानांमध्ये काहीही बदल नाही. बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने ३९६ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर भारताचा रवींद्र जडेजा या यादीत २४५ गुणांसह नवव्या स्थानावर कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चाहत्यांच्या उत्साहाला येणार उधाण! या सामन्यात दिसणार १८ हजार प्रेक्षक
स्मृती मंधाना बनली आत्मनिर्भर, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
कोरोना झाल्यावर या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटत होती, अक्षर पटेलने उलगडला अनुभव