आयसीसीने पुरुष आणि महिला यांच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ‘ पुरस्कारासाठी बुधवारी (6 डिसेंबर) नामांकने जाहीर केली. आयसीसीने या पुरस्कारासाठी पुरुष आणि महिला यांच्यातील प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंना नामांकन म्हणून निवडले. आयसीसीच्या सोशल मीडिया खात्यावरून या पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, पोस्ट शेअर करताना एक मोठी चूक झाली, जी आयसीसीला महागात पडली आहे. या एका चुकीमुळे सोशल मीडियावर आयसीसी ट्रोल केले जात आहे.
प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी आयसीसीने तीन पुरुष आणि तीन महिला खेलाडूंना नामांकन जाहीर केले. यावेळी महिलांची नामांकने सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांच्याकडून ही चूक झाली. महिला खेळाडूंच्या फोटोखाली त्यांची नावे येणे अपेक्षित असताना पुरुष खेळाडूंची नावे लिहिल्याचे चाहत्यांना पाहायला मिळाले. चाहत्यांना आयसीसीकडून झालेली ही चूक लगेच लक्षात आली आणि याचे स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होऊ लागले.
Saste Nashe😂#ICCPLAYEROFTHEMONTH#Pele #CricketWorldCup pic.twitter.com/Dtu5eaJQXB
— बालकृष्ण चौबे 🇮🇳 (@Balkris15672044) December 6, 2022
प्लेअर ऑफ द मंथसाठी ज्या तीन महिला क्रिकेपटूंना नामांकन मिळाले, त्यामध्ये पाकिस्तानची सिदरा अमीन, आयर्लंडची गॅबी लुईस आणि थायलॅडची नट्टकन चंथम यांचा समावेश होता. मात्र आयसीसीकडून या तिघांच्या फोटोखाली जॉस बटलर, नट्टकन चंथम आणि आदिल रशीद आणि शाहीन आफ्रिदी यांची नावे दिली गेली होती. त्यांच्याकडून घडलेली ही चूक ट्रोलर्ससाठी भांडवल ठरत आहे. जॉस बटलर, आदिल राशीद आणि शाहीन आफ्रिदी यांना पुरुषांमधून प्लेअर ऑफ द मंथ पुसरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पण पोस्ट करताना ही कर्मचाऱ्यांकडून महिलांच्या फोटोखाली पुरुषांची नावे टाकली गेली. सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकजण आयसीसीला ट्रोल करत आहेत, तर काहीजण समजूतदारपणा दाखवत चुक नजरेआडही घालत आहेत.
Yes 😭😂 pic.twitter.com/OiEuHoOkV3
— 𝙐𝙈𝘼𝙍 (@UMAR__103) December 8, 2022
https://twitter.com/sohamrathi99/status/1600121803103670274?s=20&t=HK-Q79is9sHvFzKM8xRbSQ
पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज सिदरा अमीन हिने याविषयी मजेशीर पोस्ट केली आहे. तिने एक ट्वीट करत लिहिले की, “मला हे माहीत नव्हते की, जॉस बटलर माझा जुळा भाऊ आहे.” पोस्टमध्ये तिने स्माईलीच्या इमोजी देखील शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये सिदराने तो फोटो देखील वापरला आहे, ज्यामध्ये आयसीसीने चूक केली होती. (ICC made a big mistake in posting Player of the Month)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची निवड, या खेळाडूच्या पुनरागमनामुळे भारताची चिंता वाढली
रोहित शर्माच्या झुंझार खेळीबदद्ल सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, ट्वीट करत व्यक्त केला आदर