नुकतीच इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. पण या मालिकेनंतर आता असे समोर येत आहे की सामनाधिकारी फिल व्हिटीकेस कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आढळले आहेत. त्यांनी या मालिकेदरम्यान सामनाधिरी म्हणून भूमिका बजावली होती. ते आता १० दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये असतील. याबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार व्हिटीकेस बरे असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच ते युनायटेड किंगडमच्या नियमानुसार सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहे.
असे असले तरी २९ जूनपासून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सुरु होणाऱ्या वनडे मालिकेला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुढे माहिती दिली की ‘सामनाधिकारी आणि भ्रष्टाचारविरोधी समीतीतील एकूण ७ सदस्यांचा जवळचा संपर्क आल्याचे स्पष्ट झाले आहे. या ७ जणांना १० दिवसांपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.’
त्याचबरोबर असेही सांगण्यात आले आहे की श्रीलंका आणि इंग्लंड संघातील कोणत्याही सदस्याला धोका नाही. तसेच २९ जून रोजी होणाऱ्या वनडे सामन्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून नियोजित वेळेप्रमाणेच हा सामना होईल.
वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडने श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला आहे. आता वनडे मालिकेतील पहिला सामना २९ जूनला डरहॅमला होईल. त्यानंतर १ जुलैला लंडनला तर ४ जुलैला ब्रिस्टोलला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना होईल. या मालिकेत बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे खेळाडू दुखापतीमुळे इंग्लंड संघाचा भाग नाहीत. ते ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान भारताविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून इंग्लंड संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीला घवघवीत यश, एकाच दिवशी जिंकले ३ सुवर्णपदकं
श्रीलंका दौर्यासाठी कर्णधार-प्रशिक्षकांची जोडी तय्यार! चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी