---Advertisement---

अबब! पुढील ४ वर्षात होणार क्रिकेटचे ५ वर्ल्डकप!

On: गुरूवार, एप्रिल 23, 2020 8:22 PM
---Advertisement---

कोलकाता | आयसीसीने २०१८मध्ये २०१९ ते २०२३ या ५ वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात त्यांनी ६ विश्वचषकांची घोषणा केली होती. 

त्यात २०२१ ला होणारी चॅपियन्स ट्राॅफी रद्द करुन त्याऐवजी एक टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. 

यात आयसीसी कसोटी चॅंपियनशीपची यात घोषणा करण्यात आली होती. जी सध्या जगभरात सुरु झाली आहे परंतु कोरोना व्हायरसमुळे सध्या यातील कोणतेही सामने होत नाही.

यात ५० षटकांचा विश्वचषक जो २०१९ रोजी झाला तो सोडून अजूनही तब्बल ५ विश्वचषक होणार आहेत. त्यात दोन कसोटी चॅंपियनशीप, एक ५० षटकांचा विश्वचषक तसेच दोन टी२० विश्वचषकांचा समावेश आहे. 

कसोटी चॅंपियनशीप दोन वर्ष खेळवून फायनल ही २०२१ तसेच २०२३ मध्ये होणार आहे. यामुळे एकप्रकारे कसोटीचेही दोन विश्वचषक या काळात होणार आहेत.

पहिली कसोटी चॅंपियनशीपशीप २०१९ ते २०२१ या काळात होणार आहे तर दुसरी कसोटी चॅंपियनशीप २०२१ ते २०२३ या काळात होणार आहे. २०२३ च्या ५० षटकांचा विश्वचषकच्या पात्रता फेऱ्या २०२० ते २०२२ या काळात होणार आहेत. 

आयसीसीच्या पुढील ५ वर्षातील महत्वाच्या स्पर्धा

२०२०- २० षटकांचा विश्वचषक

२०२१- २० षटकांचा विश्वचषक

२०२१- कसोटी चॅंपियनशीप फायनल

२०२३- ५० षटकांचा विश्वचषक

२०२३- कसोटी चॅंपियनशीप फायनल

ट्रेंडिंग घडामोडी – 

ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाऐवजी होणार आयपीएल?

या कारणामुळे मास्टर ब्लास्टर साजरा करणार नाही वाढदिवस

केवळ २ वेळा कसोटीत फिरकीपटूंनी टाकल्या होत्या पहिल्या २ ओव्हर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment