भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 संघांपैकी आतापर्यंत 6 संघांनी संघ जाहीर केला आहे. मात्र, 4 संघ अजूनही बाकी आहेत. विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे होणार आहे. अशात चला तर कोणत्या संघांनी संघ जाहीर केला आणि कुणी नाही, ते जाणून घेऊयात…
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी संघाची घोषणा करणाऱ्या संघांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. तसेच, घोषणा न करणाऱ्या संघांमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या नावांचा समावेश आहे.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळली जाईल. स्पर्धेत भाग घेत असलेल्या संघांना प्रत्येक संघासोबत साखळी फेरीत प्रत्येकी 1 सामना खेळावा लागेल. प्रत्येक संघाने साखळी फेरीत 9 सामने खेळल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल 4 संघांना उपांत्य फेरीत जागा बनवता येईल. 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना मुंबईत, तर 16 नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथे खेळला जाईल. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे खेळला जाईल.
विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.
न्यूझीलंड संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम लॅथम (उपकर्णधार), डेवॉन कॉनवे, मायकल चॅपमन, डेरिल मिचेल, विल यंग, ग्लेन फिलिप्स, जिमि निशाम, रचिन रवींद्र, मिचेल सॅंटनर, ईश सोढी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी.
अफगाणिस्तान संघ-
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, रहमान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
ऑस्ट्रेलिया संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड, ऍश्टन अगर, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क, सीन ऍबॉट.
नेदरलँड संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.
दक्षिण आफ्रिका संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, सिसांडा मगाला, केशव महाराज, एडेन मार्करम, लुंगी एन्गिडी, डेविड मिलर, एन्रीच नॉर्किया, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वॅन दर दुसेन, जेराल्ड कोएट्जी. (icc men cricket world cup 2023 7 teams announced squads this 3 teams remains)
हेही वाचा-
‘विराट कोहली एवढी शतके ठोकेल, जेवढी…’, माजी पाकिस्तानी कर्णधाराची विचित्र भविष्यवाणी
‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता






