भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार वर्ल्डकपचे एकूण पाच सामने हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई शहरात होणार आहे. मुंबईतील वानखेडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हे सामने होणार आहे. 2011 साली याच मैदानावर तब्बल 28 वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर याच मैदानावर वर्ल्डकप 2023 चे एकूण 5 सामने होणार आहेत. ( ICC Mens Cricket World Cup 2023 schedule is out Matches will be held at Mumbai Wankhede Stadium )
खास बाब म्हणजे मुंबईत होणाऱ्या 5 सामन्यांत एक सेमीफायनल देखील आहे. त्यामुळे जर या सेमीफायनलमध्ये भारत खेळणार असेल तर टीम इंडियाला अहमदाबादेत होणाऱ्या फायनलचं तिकीट मुंबई देणार का? हे पाहावे लागले. तत्पुर्वी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी एक अ्त्यंत महत्वाची बाब म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियम प्रमाणेच पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर देखील वर्ल्डकप 2023 चे 5 सामने होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे दोन ठिकाणी वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. ( The ICC Men’s Cricket World Cup 2023 schedule is out now )
आयसीसी वनडे विश्वचषकाचे मुंबईत होणारे सामने
21 October – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( 21 October – England vs South Africa )
24 October दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश ( 24 October – South Africa vs Bangladesh )
2 November भारत विरुद्ध क्वालिफायर संघ ( 2 November – India vs Qualifier 2 )
7 November ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान ( 7 November – Australia vs Afghanistan )
15 November सेमिफायनल 1 ( 15 November – Semifinal 1 )
भारतात यंदा आयसीसी वनडे विश्वचषकाचे सर्व सामने होणार आहेत. या विश्वचषकासाठी वेळापत्रकाची घोषणा मंगळवारी (27 जून) करण्यात आली. विश्वचषकाचा उद्घाटनाचा सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर, अंतिम सामना देखील याच मैदानावर 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
अधिक वाचा –
– एकच नंबर..! आपल्या पुण्यात होणार वर्ल्डकपचे 5 सामने, जाणून घ्या गहुंजेवर होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक
– याला म्हणतात वचक! फायनलला गेला तरी महाराष्ट्रात येणार नाही पाकिस्तान संघ, असं केलं नियोजन